अजित पवार पत्रकारावर भडकले;पाहा नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar got angry at the journalist; see what actually happened?

 

 

 

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यावेळी अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यादेखील उपस्थित होत्या.

 

 

 

यावरून अजितदादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांनी दादांना खोचक सवाल केला. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, पत्रकाराने

 

 

 

श्रीनिवास पवारांचा आपले मोठे बंधू असा उल्लेख केला आणि अजित पवार भडकले. माहिती घेऊन प्रश्न विचारत जा, असे अजित पवारांनी पत्रकाराला सुनावले.

 

 

 

मंगळवारी सकाळी अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासह आशाताई पवारांना घेऊन मतदानासाठी काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोहोचले.

 

 

 

यावेळी बोलता बोलता त्यांनी मेरे पास मेरी माँ है, अशा स्वरूपाचा डायलॉग ऐकवला. यावरून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार संतापले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांवर टीका केली.

 

 

 

 

दुपारच्या सुमारास अजित पवारांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा पत्रकाराने साहजिकच हाच प्रश्न अजित पवारांना विचारला. पत्रकाराने मोठे बंधू

 

 

 

 

असा उल्लेख करताच अजित पवारांना हा प्रश्न आवडला नसावा की काय म्हणून अजितदादा भडकले आणि त्यांनी पत्रकारालाच फैलावर घेतले.

 

 

 

‘माहिती घेत नाही, माहिती नसते, काहीही विचारता आणि पुन्हा मी बोलल्यानंतर अजित पवार बोलतो असे सांगता,’ असे म्हणत पवारांनी पत्रकारांना श्रीनिवास पवार हा माझा धाकटा भाऊ असून त्याच्यापेक्षा मी तीन वर्षांनी मोठा असल्याची माहिती दिली.

 

 

 

एवढ्यावरच न थांबता अजित पवारांनी पुन्हा कुटुंबाचा इतिहास मांडला. अजित पवार म्हणाले, मला कुटुंबाचा पंचनामा करायचा नाही,

 

 

 

पण आई आजारी असताना तिची काळजी सर्वाधिक मी घेतली. त्यावेळी हे विचारणारे जे कोणी आहेत, ते कोणीही तेथे नव्हते. माझी आई कालही माझ्याबरोबर होती, आजही माझ्याबरोबर आहे आणि उद्याही माझ्याबरोबर असेल, असे स्पष्ट केले.

 

 

 

 

 

दरम्यान अजित पवार यांनी ‘रोहित पवार अलीकडच्या पिढीचा असल्याने त्याला सोशल मीडिया कसा वापरायचा हे चांगले माहित आहे. आम्ही कामाची माणसे आहोत सकाळी सहा वाजल्यापासून विकास कामे करतो.

 

 

 

 

त्याने ज्या पद्धतीने सोशल मीडियावर वेल्हे तालुक्यातील जी पीडीसीसी बँक उघडी होती, असे आरोप केले. त्या बँकेची सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहावेत.

 

 

 

 

रोहित सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे की हे फुटेज तो कालचेच आहे, हे दाखवू शकतो. रोहितला सध्या काही उद्योग नाहीत,

 

 

 

तो असेच माझ्याबद्दल वेडेवाकडे काहीतरी आरोप करत आहे. या माध्यमातून लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करत आहे,’ अशा शब्दांत रोहित पवारांना देखील डिवचले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *