काँग्रेसमध्ये उत्साह; नाना पटोलेंचा प्लॅन ,हालचालींना वेग, पुढच्या दोन टप्प्यांसाठी नवी रणनीती

Enthusiasm in Congress; The plan of various stages, the speed of movement, the new strategy for the next two phases

 

 

 

 

 

महाराष्ट्रात कालच लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला आहे. महाराष्ट्रात 11 जागांसाठी झालेल्या मतदानात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे.

 

 

 

महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांमध्ये सुप्रिया सुळे, नारायण राणे, शाहु महाराज, उदयनराजे भोसले आदी दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

 

 

आता महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होत आहे.

 

 

 

या तिसऱ्या टप्प्यात विदर्भातील जागा असल्याने विदर्भातील कॉंग्रेसचे दहा आमदार तळ ठोकणार आहेत. तसेच या टप्प्यासाठी कॉंग्रेस आणखी एक हुकूमाचा पत्ता बाहेर काढणार आहे.

 

 

 

आता महाराष्ट्रात लोकसभेच्या उरलेल्या दोन टप्प्यातील 24 जागात राज्यात कॉंग्रेस यंदा लोकसभेच्या केवळ सहा जागा लढवित आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने मोठी रणनीती आखली आहे.

 

 

आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रचाराला न आणता कॉंग्रेस त्यांच्या ऐवजी प्रियंका गांधी आणि कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना मैदानात उतरविणार आहे.

 

 

चौथ्या टप्प्यात कॉंग्रेसची ताकद असलेल्या विर्दभातील कुमक प्रचारासाठी मागविली आहे. कॉंग्रेस आता चौथा टप्प्यात 13 मे रोजी असलेल्या मतदानात

 

 

 

पुणे, जालना आणि नंदुरबार येथे उमेदवार उभे केले आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी याआधीच पुण्यात सभा घेतली आहे. तर प्रियंका गांधी – वढेरा आता नंदुरबार येथे येत्या 10 मे रोजी प्रचारदौरा करणार आहे.

 

 

 

 

पाचव्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथून कॉंग्रेसने आपला लोकसभेचा उमेदवार उभा केला आहे. तर मुंबईतील दोन जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार उभे राहीले आहेत.

 

 

 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे भूषण पाटील उभे राहीले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उभे केले आहे.

 

 

कॉंग्रेसने बहुभाषिक मतदारांची संख्या असलेल्या या जागेवर मराठी उमेदवार देण्याचे धाडस दाखवले आहे. तर मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून कॉंग्रेसचे माजी दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड उभ्या राहील्या आहेत.

 

 

मुंबईतील या दोन उमेदवारांसाठी आता या परिसरात कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना प्रचारासाठी आणण्याची रणनिती कॉंग्रेसने आखली असून त्यांची 15 मे रोजी रॅली होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी त्यांचे कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून उभे राहीले आहेत. तेथे येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

 

 

 

तसेच राहुल गांधी देशातील इतर प्रांतातही प्रचार दौरा करीत असल्याने आम्ही मुंबई आणि पुण्यात खरगे आणि प्रियंका गांधी यांना आमंत्रण दिल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

त्यामुळे राहुल गांधी अनुपलब्ध असणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मात्र नाशिक, भिवंडी आणि मुंबईत 15 मे रोजी तीन प्रचारसभा होणार आहेत.

 

 

 

तसेच 17 मे रोजी देखील नरेंद्र मोदी यांचा मुंबई रोड शो होणार आहे. गृहमंत्री अमित शाह देखील येत्या 12 मे रोजी मुंबईतील रॅलीला संबोधित करणार आहे.

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या मुंबई आणि महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आता दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे घर घ्यावे

 

 

 

आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोरीवली आपले घर घ्यावे अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांवर टीका केली होती.

 

 

 

 

त्यांनी कितीही वेळा येऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे आणि विरोधकांची महाविकास आघाडी आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्यास समर्थ असल्याचीही संजय राऊत यांनी म्हटले होते.

 

 

आतापर्यंत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भंडारा, अमरावती, सोलापूर आणि पुणे येथे सभा केल्या आहेत. तर प्रियंका गांधी यांची केवळ लातूर येथे एकच रॅली झाली आहे. तर कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांची नागपूर येथे रॅली झाली आहे.

 

 

 

पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे ला मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सुटली आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

 

रविंद्र धंगेकर निवडून यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे रविंद्र धंगेकर यांचं काम करत असताना नाना पटोले यांना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याची चर्चा आहे.

 

 

 

यामुळेच नाना पटोले यांनी आपली स्वत:ची एक टीमच पुण्यात उतरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले यांनी विदर्भातील काँग्रेसच्या तब्बल 10 आमदारांना पुण्यात आणलं आहे. हे सर्व आमदार पुण्यात सलग 5 दिवस तळ ठोकून असणार आहेत. हे सर्व आमदार थेट पक्षाला रिपोर्ट देणार आहेत.

 

 

 

 

रविंद्र धंगेकर यांच्यासाठी स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लक्ष ठेवून आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणी, प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी याचं नियोजन नाना पटोले यांनी हातात घेतलेलं आहे.

 

 

 

विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी विदर्भातील आमदारांना पुण्यात आणलं आहे. काँग्रेसमध्ये देखील एक अंतर्गत गटबाजी दिसत आहे. त्याचा फटका बसू नये, स्वत:ची एक टीम असावी यासाठी नाना पटोले यांनी लक्ष घातलेलं आहे.

 

 

 

विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत. हे सर्व 10 आमदार पक्षाला रिपोर्ट सादर करणार आहेत. काँग्रेस आमदारांची टीम पुण्यात दाखल होत आहे.

 

 

 

 

रवींद्र धंगेकर यांच्यासाठी विदर्भातील काँग्रेसची टीम सज्ज होणार आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाना पटोले यांनी स्वतःची टीम मैदानात उतरवली आहे.

 

 

 

 

या आमदारांमध्ये यशोमती ठाकूर, सुनील केदार, धीरज लिंगडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, अमित झनक, राजू आवळे,

 

 

 

नाना पटोले यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार दररोज पक्षाला रिपोर्ट देणार आहेत. हे सगळे आमदार ५ दिवस पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत.

 

 

 

रविंद्र धंगेकर हे गेल्यावर्षी पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्षाने त्यांना थेट पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. इथे त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मुधोळकर यांच्यासोबत होत आहे.

 

 

 

या निवडणुकीत कुणाचा विजय होईल ते 4 जूनला स्पष्ट होईलच. पण शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार यांचा चांगले दिवस येतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेलं वक्तव्य खरं ठरलं तर काँग्रेस पक्षाला आगामी काळात चांगले दिवस येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *