विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार

It will rain with lightning

 

 

 

 

राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण दिसत असलं तरीही काही भागांमध्ये मात्र तापमान वाढ सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, हवेतील दमटपणा वाढून

 

 

 

त्यामुळं अडचणींमध्ये भर पडताना दिसणार आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं चांगलीच कोंडी होताना दिसणार आहे.

 

 

 

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र,

 

 

 

 

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

 

यावेळी वाऱ्यांचा वेग साधारण 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. विदर्भातही

 

 

 

 

काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

 

 

मान्सून १९ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे. मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

 

 

 

 

 

मे महिना सुरु झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाट सर्व जण पाहतात. यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.

 

 

 

 

आयएमडीने १९ मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमानाची दिली गेली होती. त्यानुसार अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झाला आहे.

 

 

 

 

बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे.

 

 

 

 

यासंदर्भात ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी केले आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. यंदा तीन दिवस आधीच आला आहे.

 

 

 

 

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.

 

 

 

 

मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होणार आहे. 19 आणि 20 मे रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

 

 

 

 

त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

21 मे 2024 रोजी 204.5 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *