मी ही अजितदादांसारखा एकाकी पडलो !शिंदें गटाच्या खादाराचे धक्कादायक वक्तव्य
I am lonely like Ajit Dadan! Shocking statement of the leader of the Shinde group
बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवलं.
त्यांच्यासमोर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे. राज्याच्या राजकारणात हा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. आता शिंदेसेनेतील एका खासदारानं आपली अवस्था अजित पवारांसारखी झाली असल्याची भावना बोलून दाखवली.
बारामतीत प्रचार करताना अजित पवार एकटे पडल्याचं चित्र दिसलं. त्यांच्यासोबत कुटुंबातील अन्य कोणीही नव्हतं. सख्ख्या भावासह सगळ्यांनीच शरद पवार, सुप्रिया सुळेंना साथ दिली.
आमच्या कुटुंबात माझी अवस्थादेखील अजित पवारांसारखीच असल्याचं वायव्य मुंबईचे शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी बोलून दाखवली. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मी शिंदे गटात जाऊ नये अशी कुटुंबातील सगळ्यांची इच्छा होती. पत्नी, मुलगा, दोन लेकी यांचा विरोध होता. मी तिकडे जाण्यामागं स्पष्ट कारण होतं. त्या कारणामुळे मी तिकडे गेलो.
मी तिकडे जाण्यामागे ईडी, खोकेबिके अशी कारणं नाहीत. काही लोक खोक्यांसाठी तिकडे गेल्याचं म्हणतात. ते पण चुकीचं आहे. माझ्यामागे काही ईडी वगैरे नाही,
असं कीर्तीकरांनी स्पष्टपणे सांगितलं. कुटुंबात माझी अवस्था अजित पवारांसारखी झाली आहे. घरातील सगळेच सदस्य माझा लेक अमोलसोबत आहेत, असं गजानन कीर्तीकर म्हणाले.
शिंदे गटात जाऊ नका, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला. आम्हाला तो आवडलेला नाही. मी त्यांना विरोध केला होता, असं कीर्तीकरांच्या पत्नीनं सांगितलं.
मतदान करुन त्या कारमध्ये बसल्या. त्यावेळी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. यावेळी गजानन कीर्तीकर मागच्या सीटवर बसलेले होते.
शिंदे आमच्याकडे कितीदा येत होता. तो तुमच्यापेक्षा लहान आहे. तिकडे जाऊन तुम्ही त्याला सलाम ठोकणार हे आम्हाला योग्य वाटत नाही, असं मी त्यांना आधीच म्हणाले होते, याची आठवण कीर्तीकरांच्या होम मिनिस्टर यांनी करुन दिली.
शिंदेकडे जाऊ नका असं त्यांना सांगितलं होतं. मी हातचं राखून बोलत नाही. जे पटत नाही ते बोलून दाखवायला कसली भीती बाळगायची, असा प्रश्न त्यांनी केला.
मी अमोलच्या पाठिशी आहे. माझं मत त्यालाच. तो विजयी होईल यात तीळमात्र शंका नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गजाजन कीर्तीकर २०१४ पासून वायव्य मुंबई मतदारसंघातून दोनदा निवडून आले. शिंदे गटात दाखल होणारे ते सर्वात शेवटचे खासदार ठरले.
त्यांचे पुत्र अमोल हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यांना वायव्य मुंबईतून ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंनी आमदार रविंद्र वायकर यांना तिकीट दिलं आहे. गजानन कीर्तीकरांनी या निवडणुकीत त्यांच्या लेकाविरुद्ध प्रचार केला.