गुजरातमध्ये भाजपचेच आमदार आपल्याच सरकारवर नोंदवत आहेत आक्षेप

In Gujarat, BJP's own MLAs are registering objections against their own government

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना गुजरात भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांना आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काम केल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

सरकारी यंत्रणेबद्दल पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या होम ग्राऊंडवर नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

जनहिताच्या कामांसाठी पत्रं लिहा. पण कोणताही पत्रव्यवहार सोशल मीडियावर शेअर करु नका, अशा सूचना गुजरात भाजपनं आपल्या आमदारांना दिल्या आहेत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

 

 

 

 

गेल्या १५ दिवसांमध्ये भाजपच्या ३ आमदारांनी आणि एका शहराध्यक्षानं स्वपक्षीय सरकारच्या यंत्रणेबद्दलचे आक्षेप नोंदवले.

 

 

 

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाजपचे आमदार आपल्याच प्रशासनाविरोधात आवाज का उठवताहेत, असा प्रश्न अनेकांना पडला.

 

 

 

 

जातीच्या प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयतील एजंट्स लाच मागत असल्याचा मुद्दा सूरतच्या वराच्चाचे आमदार कुमार कनानी यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

तर जुनागढचे आमदार संजय कोरडिया यांना थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मतदारसंघात असलेल्या तळाच्या सुशोभिकरणाच्या कामासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सरकारी अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार कोरडियांची आहे.

 

 

 

महुधा मतदारसंघाचे आमदार संजय सिंह महिदा यांनी तालुका विकास अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्यानं प्राथमिक शाळांसाठी निकृष्ट दर्जाचे कूलर्स

 

 

 

आणि अन्य उपकरणं खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर भावनगर जिल्ह्यातील गरिअधर शहराच्या भाजप अध्यक्षांनी मुख्य अधिकारी

 

 

 

 

आणि पालिकेचे अधिकारी केवळ आम आदमी पक्षाच्याच आमदाराच्या सूचना ऐकत असल्याची तक्रार पत्रातून केली.

 

 

 

 

भाजपचे आमदार आणि पदाधिकारी सरकारी यंत्रणेबाबत लिहित असलेल्या पत्रांमुळे राज्यातील सरकारची प्रतिमा डागाळली जात असल्याचं वरिष्ठ नेत्यांना वाटतं.

 

 

 

 

सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे, अधिकारी जुमानत नाहीत, असा संदेश आमदारांच्या पत्रांमुळे जाऊ लागला आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांना पत्र सोशल मीडियावर पोस्ट करु नका, अशी सूचना करण्यात आली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *