भरदिवसा तहसीलदारांवर हल्ला; गाडीची तोडफोड

Attack on the tahsildar all day; Vandalize the car

 

 

 

 

 

मोठी बातमी समोर आली आहे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

 

 

 

 

आरोपीने सोबत आणलेली मीरचीची पूड देखील त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात ही घटना घडली आहे.

 

 

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

 

 

इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी आली असता हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला कोला.

 

 

 

 

गाडीची तोडफोड करण्यात आली. सोबतच हल्लेखोराने आपल्यासोबत मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील पाटील यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न झाला.

 

 

 

 

 

या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवानं तहसीलदार यातून थोडक्यात बचावले आहेत.

 

 

 

या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले आहेत. इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सूरू असल्याची माहिती पोलिसांकडू देण्यात आली आहे.

 

 

 

 

दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

 

 

 

‘इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला.

 

 

 

 

हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.

 

 

 

 

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे.

 

 

 

 

तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

 

 

 

गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.’ असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *