गोळ्या झाडून केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला

Attack on Union Ministers by firing bullets

 

 

 

 

केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांचा ताफा काल रात्री मसौरी परिसरातून जात असताना गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. राम कृपाल यादव या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु असताना यादवांनी पाटलीपुत्र मतदारसंघात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

 

 

 

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. आरजेडीच्या स्थानिक आमदार रेखा पासवान यांनी काल एका मतदानकेंद्राला भेट दिली यादरम्यान सहकारी आणि गावकरी यांच्यात बाचाबाची झाली, असे वृत्त आहे.

 

 

 

 

ही बाब राम कृपाल यादव यांना समजताच त्यांनी मतदानकेंद्रावर धाव घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. परंतु ते परतत असताना त्यांच्या ताफ्याला गोळ्या झाडण्यात आल्या.

 

 

 

मंत्री यादव स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाले. पण यावेळी त्यांच्या काही समर्थकांना जबर मारहाण करण्यात आली. याचा विरोध करत समर्थकांनी रास्ता रोको केला.

 

 

 

 

पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत त्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर समर्थकांनी रस्ता मोकळा केला आणि वाहतूक सुरळीत झाली.

 

 

 

दरम्यान केंद्रीय मंत्र्यांसोबत घडलेल्या या घटनेने मसौरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

 

 

 

 

घटनेबद्दल पाटणाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली की पाटणा-जेहानाबाद रोडवर भाजपाचे मंत्री राम कृपाल यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाला

 

 

 

 

आणि या घटनेत पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला. याची दखल घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत.’

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *