अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात काँग्रेसला लीड,मतदारांना चव्हाणांचा निर्णय पटला नाही

Congress lead in Ashok Chavan's constituency, voters did not agree with Chavan's decision

 

 

 

 

 

अशोक चव्हाणांनी काँग्रेसशी फारकत घेतल्याने नांदेड लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं होतं. राजकीय जाणकारांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात होते.

 

 

 

 

शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात आल्याने भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना सर्व विधानसभा मतदारसंघातून फायदा होणार असल्याचं म्हटलं जात होतं.

 

 

 

मात्र, गणित पूर्णपणे फिस्कटलं आणि चिखलीकर यांचा पराभव झाला. एवढंच नाही तर चिखलीकर यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघातूनच खूप कमी मताधिक्य मिळालं.

 

 

 

भोकर विधानसभा क्षेत्रातून भाजपाला केवळ ८४१ मतांची जुळवाजुळव करता आली. तेव्हा भोकरच्या जनतेने अशोक चव्हाण यांना हिसका दाखवला, अशी चर्चा आता रंगत आहे.

 

 

 

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बालेकिल्यातच काँग्रेसला सुरंग लावत विजय मिळवला होता.

 

 

 

२०२४च्या निवडणुकीत काँग्रेसने वसंत चव्हाण यांच्या रूपाने आपला गड पुन्हा खेचला केला. काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाणांनी ५९ हजार ४४२ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

 

 

 

 

चव्हाण यांना ५ लाख २८ हजार ८९४ मतं पडली, तर भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना ४ लाख ६९ हजार ४५३ मतं मिळाली. ज्या प्रकारे २०१९च्या निवडणुकीत नांदेडचा अनपेक्षित निकाल लागला होता, तसाच यावेळचा निकाल ही वेगळा ठरला आहे.

 

 

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणं नांदेडच्या जनतेला रुचलं नसल्याचं निकालावरुन दिसत आहे. जनतेने अशोक चव्हाणांना एक प्रकारे धक्काच दिला आहे.

 

 

 

 

सहा ही विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही. भोकर विधानसभा क्षेत्रात चिखलीकर यांना केवळ ८८१ची आघाडी मिळाली

 

 

 

तर मुखेड विधानसभा क्षेत्रात चिखलीकर ४ हजार मतांनी पुढे होते. तर नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि देगलूर या विधानसभा क्षेत्रातील जनतेने वसंत चव्हाणांना खासदारकीच मिळवून दिली.

 

 

 

 

गत निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना चांगली मोठे मताधिक्य देऊन जनतेने दिल्लीत पाठवले होते. यंदा मात्र जनतेला आकर्षित करण्यात चिखलीकरच फेल ठरले.

 

 

 

सोबतच हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. निकालानंतर अशोक चव्हाण यांचं भवितव्य ठरणार होतं.

 

 

मात्र अशोक चव्हाण जनतेला आपली भूमिका पटवून देण्यात यश आलं नाही. तसेच प्रभाव क्षेत्र असलेल्या भोकर मतदारसंघातच त्यांना मराठा समाजाच्या रोषाला तोंड द्यावं लागलं.

 

 

 

 

आगामी विधानसभेसाठी अशोक चव्हाण यांची कन्या याच भोकर मतदारसंघातून उभी राहणार आहे. यात जनतेने या ज्येष्ठ नेतृत्वाला पूर्णपणे नाकारल्याने अशोक चव्हाण आता अडचणीत आल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *