भाजपच्या बड्या नेत्याला मनोज जरांगे यांचा थेट इशारा
Manoj Jarange direct warning to BJP leader
मराठा आरक्षणाला एक वर्ष पूर्ण झाले. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला.
फडणवीस यांनी मराठा समाजाला वेढीस धरल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी मराठवाड्यातील या बड्या भाजप नेत्याला सुद्धा त्यांनी थेट इशारा दिला.
आता चकव्याला कचका दाखवतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात चिंता वाढली आहे.
रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली. मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो. मी नेहमी त्यांचा आदर करतो. त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आता केली आहे. काय करशील. तुमचं कोणी तरी उभं राहील ना कोणी तरी. मग दाखवतो कचका. कर कुणालाही उभं, असं इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी दानवे यांनी विषय लांबवू नये. रावसाहेब दानवे यांनी महिलावर केस केली. माझ्या नादी लागशील तर नागपूरची सीट पण पडत असते
मला जेल मध्ये टाकले तर पोर हनुमान सारखे जेल उचलून आणतील नाही. तर मी भोकरदन मध्ये ऑफिस उघडतो, असा इशारा त्यांनी दिला.
या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे निवडून आले आहेत. तुम्हाला देशोधडीला लावतो. रावसाहेब दानवे यांनी माझ्या नादाला लागु नये रावसाहेब दानवे चकवा,
माझ्यावर केस करायला लावली, आता तुझे कोणी उभे राहिले न दाखवतो कचका आता, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे भोकरदन मतदारसंघात टेन्शन वाढलं आहे.
धनगर समाजाने मोठा उठाव केला, पण पंचक मोचक ( गिरीश महाजन ) धनगर आंदोलन मोडीत काढले एसटी आरक्षण आंदोलन मोडले मराठा आरक्षण मोडीत काढले.
देवेंद्र फडणवीस हा बधिर डोक्याचा आणि क्रूर गृहमंत्री फडवणीस यांनी जातीय वादी पोलिसांकडून लाठीचार्ज करायला लावला. मी देवेन्द्र फडवणीस याला झोपवल्या शिवाय सोडणार नाही,
मी बदला घेणार. माझ्यावर एसआयटी नेमण्यात आली, माझ्या खिशात आठ आणे नाहीत माझ्या खिशात कोणी हात घालत नाही, असे ते म्हणाले.