चक्क आदित्य ठाकरेंनी एनडीएच्या मित्रपक्षांना दिला हा सल्ला

Aditya Thackeray gave this advice to the allies of NDA

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची एनडीएने नेतेपदी निवड केली आहे.

 

 

 

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे.

 

 

 

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी,

 

 

 

 

चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अनुमोदन देत समर्थन केलं. नवी दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व घटकपक्षांची आज बैठक झाली.

 

 

 

एनडीएचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एनडीएच्या घटकपक्षांना सल्ला दिला आहे. सगळ्यात आधी लोकसभेचं सभापतीपद मिळवा.

 

 

 

भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय. ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्याक्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरू करतील, ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *