महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी;”हे” घडले कारण
A spark of controversy in Mahavikas Aghadi; this happened because

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकसंथ
आणि ताकदीने दिसेल, अशी चर्चा होत असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे.
मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी 15 जूनला मतदान होणार होते,
पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती.
दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती.
त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली. त्यानंतर नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
यानुसार आता 26 जूनला मतदान होईल. मतमोजणी 1 जुलैला करण्यात येणार आहे. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती)
कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप)
नाशिक शिक्षक : किशोर दराडे (अपक्ष) हे सदस्य निवृत्त होत आहेत