शिंदे गटाच्या आमदाराची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका

Shinde faction MLA's blunt criticism of Ashok Chavan

 

 

 

अशोकाचे झाड हे दिसायला उंच आणि हिरवेगार असते. पण 12 वाजता त्यांची सावली केवळ स्वतःलाच मिळते, इतरांना मात्र ना सावली ना फळ असे म्हणत

 

शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी नाव न घेता भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली.

पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हेमंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यात महायुतीला 9 जागा मिळून सुद्धा मंत्रीपद मिळालं नाही.

 

अशोक चव्हाण यांच्यामुळेच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यामुळं हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली की काय? अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात सुरु आहे.

खासगी कार्यक्रमात हेमंत पाटील यांच्यासमोर अशोकाचे झाड दिसले. त्या झाडाला पाहूनच हे अशोकाचे झाड म्हणजे दिसायला उंच आणि हिरवगार असते.

 

पण त्याची 12 वाजता सावली केवळ स्वतःलाच मिळते इतरांना ना सावली ना फळ असे हे झाड असल्याची बोचरी टीका हेमंत पाटील यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर केली होती.

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे.

 

या जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला होता. या जिल्ह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, सर्वच जागांवर माहयुतीनं वर्चस्व मिळवलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *