भाजपच्या 11 बड्या नेत्यांची हकालपट्टी;काय घडले कारण ?

11 big BJP leaders expelled; what happened and why?

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली

 

तर अनेकांनी पक्षाविरोधात काम केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सर्वच पक्षाकडून अशा नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

 

आता भाजपने अकोल्यात जिल्हा परिषद सदस्यासह अकरा जणांचे निलंबन केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

अकोला जिल्ह्यात सन 2019 च्या तुलनेने 2024 मधील विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाल्यानंतर भाजपने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

 

अकोट मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद सदस्यासह 11 पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

ही कारवाई भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहे. त्यांनी या कारवाईबद्दल प्रदेशाध्यक्षांना देखील कळवले आहे.

जि.प. सदस्य प्रकाश आतकड, पं.स. सदस्य राजेश उर्फ विष्णू येऊल, अकोट येथील माजी नगरसेवक मंगेश चिखले, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र पुंडकर,

 

प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आघाडीचे विशाल गणगणे, अकोट माजी तालुकाध्यक्ष अरविंद लांडे, माजी तालुका सरचिटणीस राजेश पाचडे, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य विष्णू बोडखे,

 

माजी तालुका सरचिटणीस सुनील गिरी, युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस नीलेश तिवारी व माजी युवती प्रमुख अकोला ग्रामीणच्या चंचल पितांबरवाले यांचा समावेश आहे.

काँग्रेसने देखील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई काही दिवसांपूर्वी केली होती. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक,

 

काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना

 

6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या

 

वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यांनतर जयश्री पाटील यांचे देखील निलंबन करण्यात आले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *