दोन महाराजांमधील वाद चव्हाट्यावर ;VIDEO होतोय व्हायरल

Dispute between two maharajas on the spot; VIDEO is going viral

 

 

 

 

संत प्रेमानंद महाराज आणि पंडित प्रदीप मिश्रा यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियात चांगलाच रंगला आहे. कथावाचक पंडीत मिश्रा यांनी आपली कथा सांगताना राधा राणीसंदर्भात वक्तव्य केले.

 

 

 

त्यानंतर प्रेमानंद महाराज यांचा राग अनावर झाला. चार श्लोक वाचून तुम्ही स्वत:ला कथा वाचक म्हणतात. राधा राणीसंदर्भात तुम्हाला काय माहीत आहे?

 

 

 

या शब्दांत प्रेमानंद महाराज यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांना फटकारले. त्यानंतर प्रदीप मिश्रा यांनीही त्यांना उत्तर दिले आहे.

 

 

 

 

पंडित प्रदीप मिश्रा यांनी मध्य प्रदेशातील खंडवात कथावाचन दरम्यान प्रेमानंद महाराज यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, प्रेमानंद महाराज विद्वान संत आहेत.

 

 

 

देशात त्यांच्यासारखा महान संत कोणी नाही. ते राधा राणी आणि भगवान कृष्णाचे महान भक्त आहेत. त्यांनी मला फोन केला असता अन् सांगितले असते की प्रदीप, तुला यावेच लागेल.

 

 

 

 

त्यानंतर मी जाऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले असते. त्यांचे पाय धुतले असते. ते आचमन केले असते. त्यानंतर मग मी त्यांना उत्तर दिले असते.

 

 

 

कारण राणा राणीसंदर्भात मी जे काही बोललो त्याचा संदर्भ ब्रह्मवैवर्त्य पुराण, राधा रहस्य, कालीपीठ, ब्रिजचौरासी कोषातील अनय घोषाच्या मंदिरातून निघालेल्या ग्रंथातून घेतला आहे. याचे वर्णन ब्रह्मवैवर्त्याच्या पान 174 वर आहे.

 

 

 

प्रदीप मिश्रा यांनी राधा राणी संदर्भात म्हटले होते की, राधा राणी बरसाना येथील रहिवासी नाही. राधा राणी यांचे नाव श्रीकृष्णाच्या पत्नींमध्ये नाही.

 

 

 

राधाजींच्या पतीचे नाव अनय घोष आहे. त्यांच्या सासूचे नाव जटीला आणि नंदेचे नाव कुटीला होते. प्रदीप मिश्रा म्हणाले की, राधाजींचा विवाह छत्र गावात झाला.

 

 

 

प्रदीप मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओवर प्रेमानंद महाराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर 24 मिनिटांपेक्षा जास्त काळचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

 

 

 

 

त्यात संत प्रेमानंद महाराज रागाने प्रदीप मिश्रा यांना सांगतात की, तुम्हाला नरकातून कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही स्वत:ला खूप ज्ञानी समजतात. रस ग्रंथामध्ये अजून तुमचा प्रवेशसुद्धा नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *