मुस्लीम महिलांना माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देऊ नका,नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Don't give benefit of 'Majhi Ladki Bahin' scheme to Muslim women, leader's request to Chief Minister
अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
अशातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना वगळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून राज्य सरकार काय भूमिका घेतयं ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
प्रमोद महाजन यांनी योजनेच्या अटी शर्तींवर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील महिला सक्षम होणार आहेत.
परंतु राज्य सरकारने डोमिसाईल प्रमाणपत्राची अट घालणे आवश्यक आहे. अन्यथा राज्याबाहेरील लोक या योजनेचा फायदा घेतील”.
दरम्यान, या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट सुरवातीला 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमर्यादा 65 वर्षे इतकी करण्यात आली आहे.
तसेच जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्याची मुदत 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत बुधवार (2 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात घोषणा केली आहे.
कोणत्या महिलांना फायदा होणार ?
1) ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचे आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकता.
3) महिला या योजनेचा लाभ वयाच्या 21 व्या वर्षापासून ते 65 व्या वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत.
4) योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
5) जय महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक नसावं
कोणत्या महिलांना लाभ घेता येणार नाही ?
1) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन सुरू आहे अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2) ज्या कुटुंबातील सदस्य आयकर विभागात कर भरतात त्या कुटुंबातील महिला योजनेचा लाभ घरू शकत नाही.
3) ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत. त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) लाभार्थी महिलेचं आधार कार्ड
2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
3) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
4) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
5) रेशनकार्ड
अर्ज कसा करावा ?
1 जुलै पासून योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतला जाणार आहे. यासाठी अर्जदार महिलांना सेतु सुविधा केंद्राला संपर्क करावा लागेल. किंवा मोबाईल अॅपचा वापर करू शकता. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार महिलेला दरमहा 1500 रु आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत हस्तांतरीत केले जातील.