मुकेश अंबानी पोहोचले कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी

Mukesh Ambani reached Congress leader Sonia Gandhi's residence

 

 

 

 

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी जाऊन मुलगा अनंत अंबानी याच्या विवाहाची पत्रिका दिली आहे.

 

 

 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी विवाह संपन्न होत आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याची पूर्व तयारी गेली अनेक महिने सुरु आहे.

 

 

 

मुंबईतील त्यांच्या एंटीलिया निवासस्थानी मामेरु हा समारंभ ठेवला होता. गेल्या महिन्यात प्री वेडिंग सोहळ्यासाठी अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट इटलीला गेले होते.

 

 

 

मामेरु हा सोहळा गुजराती लग्नाचा एक विधी आहे. ज्यात वधूचे मामा तिला मिठाई आणि दागिने वगैरे भेट वस्तू देत असतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी

 

 

 

 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश आणि नीता अंबानी स्वत: जातीने जाऊन लग्न पत्रिका वाटत आहेत. मुंबईतील अनेक नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्या घरी स्वत: जाऊन लग्नाचे आमंत्रण देत आहेत.

 

 

 

गेल्या महिन्यात नीता अंबानी यांनी मुलाच्या लग्नाची पत्रिका बाबा विश्वनाथ यांच्या चरणी वाहीली होती. त्यावेळी त्यांनी 1.51 कोटी रुपयांचे दान केले होते.

 

 

 

तसेच माता अन्नपूर्णा मंदिराला एक कोटी रुपयांचे दान केले होते. वाराणसी येथील विणकरांकडून विणलेली साडी दान केली होती.

 

 

 

नीता अंबानी यांनी म्हटले होते की आपण दहा वर्षांनी वाराणसीला आल्याचे म्हटले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचा सोहळा 12 ते 14 जुलै दरम्यान होणार आहे.

 

 

 

अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका लाल रंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेली आहे. तिचा लुक चांदीच्या मंदिरासारखा आहे. लग्नाचा सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे,

 

 

 

हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. 13 जुलैला आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलैला स्वागत समारंभ होणार आहे.

 

 

 

याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पूर्व सोहळा मार्च महिन्यांमध्य गुजरातच्या जामनगरात साजरा झाला होता.

 

 

 

दुसरा विवाहपूर्व सोहळा मे महिन्याच्या अखेरीस युरोपमधील क्रूझवर साजरा करण्यात आला होता. या दोन्ही विवाह पूर्व सोहळ्यात बॉलीवूडच्या दिग्गज आणि जगभरातील कलावंताना आमंत्रण देण्यात आले होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *