अभियंत्याला 1 लाख रुपयांची लाच घेतांना अटक
Engineer arrested for accepting bribe of Rs 1 lakh
तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरण विभागाचा उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले.
किसन भीमराव कोपनर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, पिंपळगाव बसवंत येथे ते कार्यरत होते.दुकानाचे व्यावसायिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवत त्या ठिकाणी इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी
1 लाख रुपये मागितले होते. लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.