भुजबळांनंतर सुषमा अंधारेंवर जरांगे पाटलांचा पलटवार म्हणाले…
After Bhujbal, Sushma said that Jarange Patal's counterattack on Andharen...
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. जरांगे ज्या गावात भेट देत आहेत आणि सभा घेत आहेत तेथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय.
जेसीबीतून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जरांगेवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जरांगे पाटलांनी पलटवार केला आहे.
फुलाचा आणि आरक्षणाचा काय संबंध? असा सवाल जरांगे पाटलांनी सुषमा अंधारेंना विचारला आहे. आरक्षण हे मागासलेपणावर आहे. मराठा समाज ६०-७० वर्षांपासून आरक्षणाची वाट बघत आहे.
आरक्षण मिळतंय म्हणून ते फुलांची उधळण करत आनंद साजरा करत आहेत. विषय फुलाचा राहिला तर माय बाप म्हणून आनंदात मुलावर फुलांची उधळण केली जातेय, असं जरांगे पाटील म्हणालेत.
एकीकडे मागास म्हणता आणि दुसरीकडे आडनावामागे पाटील लावता. जरांगेंनी भुजबळांवर टीका करणं देखील चुकीचं आहे. एकीकडे तुमच्याकडे काहीच नाही असं तुम्ही म्हणता आणि दुसरीकडे गावांमध्ये तुमच्यावर १०० जेसीबीतून फुलांची उधळण केली जाते.
मनोज जरांगे आरक्षणासाठी लढत आहेत असं सुरुवातीला आम्हाला वाटत होतं. मात्र आता आरक्षणावरचा त्यांचा फोकस हललेला आहे, असं आम्हाला वाटत असल्याचं सुषमा अंधारेनी म्हटलं होतं.
सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र मराठा समाजाला नोटीस देऊन दबाव टकाणे थांबवा. समाजात नाराजी निर्माण होईल असे करू नका. साखळी उपोषण करणाऱ्यांना नोटिस पाठवणं थांबवा.
सरकारला विनंती समाजाशी दगाफटका करू नका. गुन्हे दाखल केल्याने समाज खचणार,घाबरणार नाही, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.