भुजबळ शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर वाटेवर? काय म्हणाले छगन भुजबळ

Bhujbal on the way to Shiv Sena Thackeray group? What did Chhagan Bhujbal say?

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याबद्दल गेल्या दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा ऐकायला मिळत आहेत.

 

 

समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. ते शिवसेना (ठाकरे) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (शरद पवार) आगामी विधानसभा निवडणुकीत

 

नशीब आजमावणार असल्याचं बोललं जात आहे. ते नांदगाव मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशा शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

 

यावर आता समीर भुजबळांचे काका, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “या केवळ प्रसारमाध्यमांनी पसरवलेल्या बातम्या आहेत. यात काही तथ्य नाही”.

 

छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही प्रसारमाध्यमं अशा बातम्या देत आहात, कदाचित तुम्हालाच जास्त माहिती असेल. समीर भुजबळ हे माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबर आहेत.

 

आता येवला मतदारसंघात काम करणार आहेत. तुम्ही सल्ला देणाऱ्या बातम्या देत आहात का? तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात तसं काही आहे का?

 

समीर भुजबळ यांनी मविआकडे जावं असं तुम्हाला वाटतं का? कारण मला या बातम्या समजल्या नाहीत. त्या कशासाठी पसरवल्या जात आहेत

 

ते देखील समजलं नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या बातम्यांचा मूळ आधार काय आहे, ते देखील मी समजू शकलो नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *