माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितला इंडिया आघाडीला सर्वात मोठा धोका कोणता?

Former Chief Minister said what is the biggest threat to the India alliance? ​

 

 

 

 

 

लोकसभा निवडणूक आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर आलेली आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती बनवण्यास सुरुवात केलेली आहे.

 

 

 

२६ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीचा सामना सत्ताधारी भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएसोबत होणार आहे.

 

 

 

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या पण जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. याविषयी गंभीर चिंता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.

 

 

जागा वाटपावर आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाली नाही तर ती बाब इंडिया आघाडीसाठी धोकादायक असेल, असं त्यांनी म्हटलं.

 

 

फारुक अब्दुल्ला पुढं म्हणाले की जर जागावाटप लवकर केलं नाही तर हा आघाडीसाठी मोठा धक्का असू शकतो. योग्य वेळेतच याबाबत निर्णय घ्यायला हवा.

 

 

 

इंडिया आघाडीत सहभागी पक्षांमध्ये लवकर सहमती झाली नाही तर काही पक्ष वेगळा गट बनवण्याची शक्यता असून ती सर्वात मोठी भीती असल्याचं फारुक अब्दुल्ला म्हणाले. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्यासोबत यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना अब्दुल्ला यांनी हे मत मांडलं.

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी देशातील २६ राजकीय पक्ष एकत्र आले. इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र, जागा वाटपाचा तिढा काही अद्याप सुटल्याचं चित्र दिसत नाही.

 

 

 

पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळ या प्रमुख राज्यांमध्ये जागावाटपावर सहमती झालेली नाही. दुसरीकडे काँग्रेसनं जागावाटपासंदर्भात एक समिती स्थापन केली आहे.

 

 

 

 

मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश यांचा समावेश आहे. यांच्यावर जागा वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणत्याही राज्यातील जागावाटपावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

 

 

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीनं काँग्रेसला २ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. तिथं डाव्या पक्षांबाबत देखील कोणताही निर्णय झालेला नाही.

 

 

 

पंजाबमध्ये आपनं १३ पैकी ६ जागा काँग्रेसला तर दिल्लीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेसकडून यावर निर्णय झालेला नाही.

 

 

बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सध्या १७ खासदार आहेत. त्यांनी १७ जागांच्या खाली येण्यास नकार दिला आहे. इथं डाव्या पक्षांची ८ ते ९, काँग्रेस ९ जागा मागितल्या आहेत.

 

 

 

बिहारमध्ये इंडिया आघाडीत सर्वाधिक आमदार असलेल्या राजदच्या वाट्याला या समीकरणानुसार केवळ ४ ते ५ जागा येऊ शकतात. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *