VIDEO;बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना ! अंबानींच्या लग्नात ठाकरेंचा डान्स ,राजकारण तापले
Begane Shadime Abdullah Diwana! Thackeray's dance, politics heated up in Ambani's wedding
देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबांनीच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र धूम आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
त्यामध्ये, राजकीय नेतेही मागे नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरेही या लग्नसोहळ्याला पोहोचले होते.
त्यानंतर, तेजस ठाकरे यांचा या लग्नसोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत शिवसेना
आणि ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केलं आहे. आता, भाजपच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर त्यांची खोचक टीका केली.
अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यवांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडलीच नाही.
जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला,
अशी खोचक टीका भाजप आमदार आमदार आशिष शेलार यांनी केली होती. भाजपच्या टीकेला शिवसेना समर्थकांनीही अमृता फडणवीसांचे नाव घेत प्रतिहल्ला केला होता.
आता, सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन अमृतावहिनींचं नाव घेतलं आहे. तसेच, आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली.
तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत,
त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का?,
असा सवालही आशिष शेलार यांना टॅग करुन सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या या तिखट, खोचक टीकेमुळे भाजपा-शिवसेनेत आणखी शाब्दीक खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
आशिष शेलारांनी एक्स पोस्ट करत तेजस ठाकरेंच्या डान्सवर टीका केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही,
ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत, जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही,जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही,
“गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!
हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या
तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं.’ यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर देत म्हटलं की, त्यांना सायकॉलॉजी मदतीची खूप गरज आहे. परिणाम होतोय.
तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.
अमृताहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते.
बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का ?
@ShivSenaUBT_ @ShelarAshish https://t.co/vFThIAV3FU— SushmaTai Andhare???? (@andharesushama) July 10, 2024