कुणबी नोंदींवरून मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष आणखीन तीव्र होणार

The conflict between the Marathas and the OBCs will intensify from the Kunbi records

 

 

 

 

ओबीसी समाजातील संत आणि राष्ट्रपुरूषांची लायकी नव्हती का? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेच्या टीकेला उत्तर दिलंय. संतांपासून ते राष्ट्रपुरूषांपर्यंतचे दाखले देत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

 

 

आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय अशी टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय.

 

 

 

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी आज एकमेकांची अक्कल काढली. जाळायला नाही, तर जोडायला अक्कल लागते अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तर जोडायला अक्कल लागते,

 

 

 

आधी नाही कळलं? असा उलटसवाल जरांगेंनी केला. मराठ्यांनी तुम्हाला जोडलं, मोठं केलं.. मात्र तुम्ही त्यांना तोडलं, असा पलटवार जरांगेंनी केला.

 

 

कुणबी नोंदींवरून मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण कुणबी नोंदी शोधणारी शिंदे समिती बरखास्त करा अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी केलीय.

 

 

तसंच सापडलेल्या कुणबी नोंदीही रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केलीय. तर आमच्या नोंदी रद्द केल्या तर तुमचंही आरक्षण रद्द होईल असा इशारा मनोज जरांगेंनी भुजबळांनी दिलाय.

 

 

आपण वादग्रस्त किंवा भडकाऊ विधानं करत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर, अजित पवारांनी आधी त्यांच्या माणसांना भडकाऊ विधानं करु नयेत हे सांगावं असं आवाहनही जरांगेंनी केलंय.

 

 

मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात आहेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

त्यांना दोन दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे.. मात्र लवकरच राज्यात चौथ्या टप्प्यातला दौरा करणार असल्याची माहिती जरांगेंनी दिलीय.

 

 

मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंमध्ये जुंपलीय. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं विधान जरांगेंनी पुण्यातल्या सभेत केलं होतं. त्यावरुनच तायवाडेंनी जरांगेंना इशारा दिलाय. आमची लायकी काढणारा जरांगे कोण असा सवाल तायवाडेंनी केलाय.

 

 

 

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हिंगोलीत महामेळावा घेतला. यात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोडून जवळपास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात सर्व ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *