मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री करण्याचा ‘या’ दोघांना मुख्यमंत्र्यांचा शब्द

Chief Minister's word to 'these' two to minister in cabinet expansion

 

 

 

 

महायुतीचा कार्यकाळ तीन महिने असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होईल का? हा कळीचा प्रश्न असताना विधान परिषदेच्या निवडणूक आटोपताच इच्छुकांना मंत्रिपदाचे वेध लागले.

 

पावसाळी अधिवेशन आणि निवडणुकीतून निवांत झालेल्या नेत्यांनी विधानसभेपूर्वी फेरबदल केल्यास रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला.

 

 

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप आणि अजित पवार गटाला मोठा फटका बसला. विधान परिषद निवडणुकीत मात्र, एक अतिरिक्त जागा लढवून महायुतीने यश मिळवले.

 

 

दुसरीकडे राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी महायुतीने प्रस्ताव दिलेला आहे. विधानसभा निवडणूक लक्षात घेता विस्तार करून महायुतीला अधिक भक्कम करावे, अशी भावना इच्छुकांची आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

 

विदर्भातून निवडून आलेले भावना गवळी, कृपाल तुमाने आणि परिणय फुके या तिघांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. गवळी व तुमाने यांना दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

 

या तिघांच्याही जिल्ह्यांचा कोटा भिन्नभिन्न आहे. तुमाने नागपूर तर, परिणय फुके यांचे नागपुरात घर असले तरी, त्यांचा विचार भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून होण्याची शक्यता आहे.

 

यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी आहेत. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड आहेत. त्यामुळे गवळी वाशीममधून दावा करण्याचा प्रयत्न करून यवतमाळमध्ये सक्रिय होतील, असे मानले जात आहे.

 

भाजपमध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे. भाजपकडे इच्छुकांची मोठी रांग आहे. प्रबळ दावेदारांमध्ये ज्येष्ठ सदस्य कृष्णा खोपडे असले तरी, आता त्यांच्यासमोर शिवसेनेच्या कोट्यातून कृपाल तुमाने यांचे आव्हान उभे ठाकले.

 

आतापर्यंत तुमाने रामटेक म्हणजे ग्रामीणचे मानले जात होते. आता ते शहरात आले आहेत. आमदार मोहन मते, समीर मेघे आणि

 

आशिष जयस्वाल आदी इच्छुकांमध्ये आहेत. खोपडे सर्वात ज्येष्ठ तर, मते यांची नागपूर सुधार प्रन्यासवर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संजय कुटे, रणधीर सावरकर, समीर कुणावारदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी भावना गवळी यांना लाल दिवा मिळावा,

 

अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळायला हवी होती, आता किमान राज्यात तरी मंत्रिपद द्यावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे.

 

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून परिणय फुके यांना पहिल्यांदा विजयी करण्याचा करिष्मा तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला.

 

त्यावेळी त्यांना राज्यमंत्री नियुक्त करण्यात आले. सद्यस्थितीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपचे फारसे बळ नाही. दोन्ही जिल्ह्यात पक्षाचा विस्तार व सदस्य वाढवण्याचे प्रयत्न होणार आहेत.

 

निवडणुकीचा विचार करता येत्या दोन-अडीच महिन्यांसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, असा प्रश्न भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *