लिपस्टीकवरून पती -पत्नीत खडाजंगी ;प्रकरण थेट पोलिसांत

Quarrel between husband and wife over lipstick; case directly to police

 

 

 

 

प्रेमाचं प्रतीक मानला गेलेला ताजमहाल ज्या शहरात आहे, उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात अशी घटना खरीच घडली आहे. तेथे एका पती-पत्नीचं लिपस्टीकवरून वाजलं आणि प्रकरण थेट पोलीसातच पोहोचलं ना.

 

 

खरंतर तो पती त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून छान लिपस्टीक घेऊन आला पण ती पाहून आनंद होण्याऐवजी त्याची पत्नी भडकली. पतीला वाटलं की गिफ्ट पाहून बायको खुश होईल,

 

 

पण इथे तर उलटंच घडलं. पत्नी म्हणाली मला (लिपस्टीकचा) हा रंग आवडला नाही. तुम्ही दुसऱ्या रंगाची लिपस्टीक घेऊन या. तेव्हा पती तिला म्हणाला की मी दुसरी लिपस्टीक तर आणेनच पण तू ही देखील ( तुझ्याकडे) ठेव.

 

मात्र त्याचं हे बोलणं ऐकून पत्नी एवढी संतापली की थेट माहेरीच निघून गेली. एवढंच नव्हे तर तिने पतीविरोधात थेट पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापलेलं पाहून, त्या दांपत्याला काऊन्सिलिंगसाठी बोलावण्यात आलं.

 

तेथे बायको म्हणाली की आमची तेवढी कमाई नाही. माझ्या पतीने मरून लिपस्टिक आणली होती,मी त्यांना म्हटलं की ती बदलून गडद लाल रंगाची लिपस्टीक आणा.

 

पण त्यांना पैशाची कदर नाही, ते माझं काहीच ऐकत नव्हते. ते म्हणत होते की ही लिपस्टीक पण ठेव आणि आपण आणखी एक आणूया. पण हा फक्त फालतू खर्च होता, नाही का?

 

त्यावर पतीनेही स्पष्टीकरण दिलं. त्याने नवऱ्याने सांगितले की, त्याला महिलांच्या मेकअपच्या वस्तूंबद्दल फारशी माहिती नाही. त्याने आणलेली लिपस्टिक, प्रेमाने आणली होती.

 

त्याला तो रंग आवडला. त्याने विचार केला की माझी बायको जेव्हा ओठांवर ही लिपस्टीक लावेल तेव्हा ती आणखी सुंदर दिसेल. मात्र त्याच्या पत्नीने त्याला लिपस्टिक बदलण्यास सांगितले.

 

 

नवरा म्हणाला- मी लाल लिपस्टिकसुद्धा आणली असती. पण मला हा रंगही आवडला होता, म्हणून मी तिला तीदेखील ठेवायला सांगितली.

 

 

अखेर त्यांचे समुपदेश करून दोघांना नीट समजावून सांगितल्यावर पती-पत्नीचे भांडण मिटले. कौटुंबिक समुपदेशन केंद्रातील समुपदेशक डॉ. सतीश खिरवार म्हणाले – आग्रा येथील तरुणीचे मथुरा येथील

 

तरुणाशी ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. नवरा गवंडी आहे. 20 दिवसांपूर्वी पत्नीने पतीकडून लाल लिपस्टिक मागवली होती. पण एके दिवशी अचानक नवऱ्याने तिला चकित करण्यासाठी लिपस्टिक आणली.

 

 

पण बायकोला तो रंग आवडला नाही. तेथूनच प्रकरण वाढले आणि पत्नी माहेरी निघून गेली. अखेर समुपदेशनानंतर दोघांमध्ये समेट झाला आहे. आता ती मुलगी पतीसह सासरी परतली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *