छगन भुजबळ म्हणाले, मी सर्व गोष्टींचा…आता आठ दिवसांनी…

Chhagan Bhujbal said, I am all things…now after eight days…

 

 

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकामुळे मोठा बॉम्बगोळा पडला. या पुस्तकात ईडीपासून सुटका करुन घेण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली,

 

असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचे लिहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली.

 

त्यात त्यांनी पुस्तकातील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आता हे पुस्तक आपण वाचणार आहोत, तसेच आपल्या वकिलास पुस्तक वाचण्यास देणार आहोत,

 

त्यानंतर आठ दिवसांनी मला जी कारवाई करता येईल ती करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’

 

या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या हेतूबाबत भुजबळ यांनी संशय व्यक्त केला. पुस्तकात आणि वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

छगन भुजबळ म्हणाले, ‘लोकसत्ते’बरोबर अशी कोणतीही मुलाखत मी दिली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सर्व भाजपसोबत गेले हा आरोप अनेक दिवसांपासून आमच्यावर होत आहे.

 

तिसरे म्हणजे कोर्टाने महाराष्ट्र सदन प्रकरणात मला ‘क्लिन चीट’ दिली आहे. ही ‘क्लिन चीट’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली होती. त्यावेळी मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पेढेही दिले होते.

भुजबळ यांनी ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकातील सर्व दावे नाकारले. ते म्हणाले, मला तुरुंगात जाण्याची भीती आहे, असा आरोप जो केला जात आहे,

 

तो मी नाकारत आहे. मी विकासासाठी एकत्र आलो. आमच्याबरोबर ५४ लोक आहेत. त्यांच्यावर प्रत्येकावर ईडीची केस नव्हती. माझ्या मतदार संघात दोन हजार कोटींची कामे सुरु आहे. सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे.

 

निवडणुकीच्या धामधुमीत हे पुस्तक का छापण्यात आले? त्यांचा हेतू काय आहे, हे पाहावे लागणार आहे. ठीक आहे, लोकशाहीत त्यांना अधिकार आहे.

 

मी पुस्तक वाचलेले नाही. आता मी पुस्तक वाचेल. त्यानंतर माझ्या वकिलांनाही ते वाचण्यास देईल. वकिलांसोबत चर्चा करेल. परंतु सध्या सात-आठ दिवस माझा सर्व फोकस निवडणुकीवर आहे.

 

तो मी बदलणार नाही. त्यानंतर मला जे कारवाई करावी लागणार आहे, ते मी करणार आहे. पुस्तकातून नको, नको त्या गोष्टी माझ्या तोंडात टाकण्यात आल्याचे दिसत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *