विधानसभा निवडणुक ;काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये,मुंबईत महत्वाची बैठक संपन्न

Assembly elections: Congress in action mode, held important meeting in Mumbai

 

 

 

आमच्याकडे पूर्ण माहिती आहे. आम्ही त्या आमदारांवर कारवाई केली आहे. आम्ही जी कारवाई केली ती भविष्यात कळेल. कॉंग्रेसमध्ये शिस्त महत्वाची आहे,

 

 

अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार के सी वेणूगोपाल यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी

 

आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेसने आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वेणूगोपाल यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

मुंबईतील बैठकीत सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुंबईत पोहोचले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 

यासोबतच जागावाटपाचा फॉर्म्युला आणि एमव्हीएचा चेहरा याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील वानखेडे स्टेडियम परिसरात पार पडली.

 

 

दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांचा रोख हा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई होते याकडेच होता.

मात्र कुठल्याही नेत्याने नेमकी काय कारवाई केली याबद्दल तपशील देण्यास असमर्थता व्यक्त केली. दस्तरखुद्द के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा यासंदर्भात बोलणं टाळलं आहे.

 

त्यांनी कारवाई केली हे सांगून टाकलं. मात्र कारवाईचं स्वरूप आणि नावं न सांगताच पत्रकार परिषद आटोपती घेतली. कारवाईचं स्वरूप आणि नावं सांगितली तर भविष्यात पक्षाला अडचण होईल,

 

असा एकंदरीत हेतू त्यात दिसत होता. तर दुसरीकडे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई करावी या संदर्भात पण काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले आहे.

 

यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर खुली कारवाई करू नये असा पण मतप्रवाह पाहायला मिळाला.

 

 

महाविकास आघाडीचा चेहरा आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेसचे नेते म्हणाले, आम्ही जागावाटपाबाबत बोलत आहोत. मग आम्ही एकत्र चर्चा करू.

 

राज्यातील काँग्रेस नेत्यांना एकजूट राहून एका आवाजात बोलण्यास सांगण्यात आले आहे. पक्ष सर्व एमव्हीए सहयोगींच्या संपर्कात आहे.

 

 

आम्ही बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करू. आज आम्ही आमच्या पक्षाला सांगितले आहे. राज्य निवडणुकीची तयारी आणि बळकट करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली.

 

 

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढाव्यात आणि सर्वाधिक जागांवर जिंकून यावं,

 

असा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यात महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे.

 

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल,

 

असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात आहे. असं असलं तरीही काँग्रेसमध्ये काही समस्या देखील आहेत.

 

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झालेलं बघायला मिळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बरोबर हेरलं आहे.

 

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी या आमदारांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई अटळ आहे.

 

या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक दादर येथील टिळक भवन येथे पार पडली.

 

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

 

आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

 

 

काँग्रेसच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना आणल्या आहेत त्याला कसं प्रतिउत्तर देण्यात येणार यासंदर्भात चर्चा झाली.

 

तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षासाठी जी थिंक टँक काम करत आहे, त्यांच्याकडून या शासकीय योजनांना कसं प्रत्युत्तर देण्यात येणार यासंदर्भातील मार्गदर्शन घेण्यात आलं.

 

काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना काढण्यात आल्या आहेत त्यासंदर्भातील धसका घेण्यात आला आहे.

 

कारण मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारकडून एक लाडली बहीण योजना सुरु करण्यात आली होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभेत सपाटून मार खावा लागला होता.

 

 

या बैठकीत आगामी काळात काँग्रेस पक्षाची निवडणुकीत काय रणनिती असेल यासंदर्भात चर्चा झाली आहे.
काँग्रेसकडून सर्वाधिक विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये दावा करण्यात येणार, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या

 

आमदारांवरील कारवाईच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. पण केसी वेणुगोपाल यांनी हा निर्णय दिल्लीतून आम्ही घेऊ, असा निर्णय या बैठकीत घेतला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *