क्रिकेटपटू विनोद कांबळीची अवस्था अतिशय बिकट ; हा VIDEO पाहून तुम्हाला बसेल धक्का

Cricket player Vinod Kambli's condition is very serious; You will be shocked to see this video

 

 

 

भारताचा धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीची बिकट अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. विनोदचा मुंबईच्या रस्त्यावरील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

या व्हिडिओमध्ये विनोद एका बाईकला टेकून उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. या बाईकला पकडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

पण त्याला काही उभे राहता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला एका व्यक्तीचा आधार घ्यावा लागला. एका व्यक्तीचा आधार घेऊनही विनोदला चालता येत नव्हते. त्याची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले.

 

विनोदला आपल्या पायांवर उभे राहता येत नसल्याचे काही लोकं पाहत होते, पण त्याच्या मदतीला मात्र कोणी येत नव्हते. विनोदला आपली अवस्था समजली

 

आणि त्याने मदतीसाठी एका व्यक्तीकडे मदत मागितल्याचे पाहायला मिळाले. विनोदला आपली अवस्था नेमकी काय आहे, हे यावेळी समजत होते.

 

आपल्याला एका व्यक्तीच्या मदतीने उभे राहता येत नाही, हे समजल्यावर विनोदने अजून एका व्यक्तीची मदत मागितली. त्यानंतर

 

अजून एक व्यक्ती विनोदच्या मदतीसाठी पुढे आली. त्यानंतर या दोन व्यक्तींनी विनोदला उचलले आणि फुटपाथवर आणले. त्यानंतर तिथे लोकांंचा घोळका जमा झाला. त्यावेळी काही लोकांनी विनोदला ओळखल्याचे पाहायला मिळाले.

 

विनोदला यापूर्वी २०१३ साली हार्ट अॅटॅक आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात नेले आणि त्याचा जीव वाचवला.

 

त्यानंतर विनोदच्या प्रकृतीमध्ये काही काळ सुधारणा झाली. पण कालांतराने पुन्हा त्याची प्रकृती ढासळली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची प्रकृती ढासळल्याचे पाहायला मिळाले.

 

 

सचिन तेंडुलकरचा खास मित्र ही ओळख पुसून टाकत विनोद कांबळीने विश्वविक्रम रचला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १००० धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता.

 

 

त्यानंतर विनोदने मागे वळून पाहिले नाही. क्रिकट विश्वात एकामागून एक विक्रम तो करत गेला. पण जस जसा यो यशाच्या पायऱ्या चढायला लागल्या तसाच

 

तो मैदानाबाहेर जास्त वेळ व्यतीत करायला लागला. त्यानंतर विनोदचे आयुष्य पूर्णपणे बदलले. कारण त्यानंतर क्रिकेटच्या मार्गावर त्याची गाडी कधीच सुसाट धावली नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *