दादांच्या गुलाबी जॅकेटवर टीका ;‘…तर कपड्यांचे दुकानदार मुख्यमंत्री झाले असते’
Criticism on Dada's pink jacket; '...the clothes shopkeeper would have been the Chief Minister'

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या गुलाबी जॅकटमुळे चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. अजित पवारांना अनेकदा पत्रकारांनीही गुलाबा जॅकेटवरून प्रश्न केल्यावर
दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मी तूला विचारतो का आज हे शर्ट का घातलं? असं दादा म्हणाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोटी केली आहे.
अजित पवारांना ज्योतिषांनी सांगितल असेल तर त्यांचा विषय आहे. कपडे हे घालून तुम्ही महाराष्ट्राशी कसे वागले आहेत यात बदल होणार आहे का? कपडे आज घातले उद्या काढायचे आसतात.
जे चांगल केलं ते लक्षात राहत वाईट पण राहत, जर कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. यावेळी बोलताना धंगेकरांनी नदी सुधार प्रकल्पावरून सरकारवर निशाणा साधला.
नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट आहे. पूरग्रस्तांचे अजून पंचनामे पूर्ण नाहीत, मदत नेमकी कधी मिळणार? मुख्यमंत्री येऊन गेलेत घोषणाबाजी करुन गेलेत.
ठेकेदार आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत. महापालिका आयुक्त फक्त ठेकेदारांचे काम करत आहेत. आर्थिक तरतूद नसताना सरकार फक्त घोषणाबाजी करत असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.