नवाब मलिक प्रकरण तापले ;दाऊदचा जावई कोण? बड्या नेत्याची फडणवीसांवर टीका

Nawab Malik case heated up; who is Dawood's son-in-law? Big leader's criticism of Fadnavis

 

 

 

नवाब मलिक प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत नवाब मलिक यांना पक्षात घेऊ नये असे बजावले आहे.

 

 

यामुळे सरकारमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. सरकारमधील अस्वस्थतेचे कारण माजी मंत्री नवाब मलिक आहेत. नवाब मलिक सध्या जामीनावर बाहेर आहेत.

 

 

त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभाग घेतला. यावेळी ते अजित पवार गटासोबत होते. यामुळे फडणवीस आक्रमक झाले आहेत.

 

 

नवाब मलिक प्रकरणावरून दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे आक्षेप घेतला आहे.

 

 

आमदार या नात्याने विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे हा आपला हक्क आहे, मात्र नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करण्यास भाजपचा विरोध असेल,

 

 

असे त्यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, नवाब मलिक यांच्याबाबत भाजपची भूमिका दुटप्पीपणा आहे. त्यांना नवाब मलिक चालत नाहीत, मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा जावई चालतो.

 

 

नवाब मलिक यांच्यावरील आरोप २० ते २२ वर्षापूर्वीचे आहेत. मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले चालत नाहीत. पण दाऊदचा जावई कसा चालतो?

 

 

दरम्यान दाऊद इब्राहिमचा जावई कोण, हे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे.

 

 

दाऊद इब्राहिमचा जावई आमदार आहे. ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. हे भाजपला कसे चालतात. नवाब मलिक यांना व्यवहार केला.

 

 

त्यांनी केला असेल किंवा नसेल त्यांचे त्यांना माहिती. जावयाला मात्र नोकरी सोडायला लावली अन् तिकीट दिलं. निवडून आणलं, याला काय म्हणायचं. भाजपचं हे वरुन किर्तन आणि आतून तमाशा सुरु आहे, असे आमदार गोटे म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *