पत्रकारांवर अजितदादा संतापले

Ajit Dada was angry with the journalists

 

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे प्रसार माध्यमांवर चांगलेच भडकले. याला कारण होतं की, पत्रकारांनी अजितदादांना त्यांच्या बारामतीतून लढण्यास रस नसल्याच्या वक्तव्यावरुन प्रश्न केला.

 

हे अजितदादांना काही आवडलं नाही आणि ते पत्रकारांवर चांगलेच भडकले. मी प्रत्येक ठिकाणी बाईट द्यायला बांधिल नाही, असं अजित पवार म्हणाले आणि तेथून निघून गेले.

 

अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

 

बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. जय पवार यांच्या कार्यकर्त्यांची मागणी असेल तर त्यांच्या उमेदवारीबाबत विचार करु, असं अजित पवार म्हणाले होते.

 

जय पवार यांच्या बारातमीतून उमेदवारीबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले की, काम मी बघितलं आहे,

 

तुम्ही काहीही प्रश्न विचारता. अमुक-अमुक व्यक्ती बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छूक आहे का, असं तुम्ही विचारलं होतं. त्यावर मी म्हटलं की, लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.

 

तुम्हीही लढवू शकता, पण तुम्ही यावर बातमी काय चालवली?, असं म्हणत अजितदादांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.

 

त्यानंतर अजितदादांना पत्रकारांनी काल पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या झालेल्या बैठकीविषयी माहिती विचारली. तेव्हा दादा आणखी संतापले, बैछकीत काय घडलं हे प्रत्येकवेळी तुम्हाला सांगायची गरज नाही.

 

तुम्ही काहीही चर्चा कराल, त्या चर्चांवर उत्तर द्यायला मी बांधिल नाही, असं म्हणत ते तिथून निघून गेले.

 

जय पवार यांच्या समर्थकांकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यांना उमेदवारी दिली जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी काल विचारला.

 

त्यावर अजित पवार म्हणाले की, “लोकशाही आहे, मी देखील बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली आहे. आता मला

 

बारामतीतून निवडणूक लढवण्यात फार रस नाही. जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जर जनतेचा कल असेल तर पक्ष त्याचा विचार करेल”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *