जेलमध्ये संजय राऊत -अनिल देशमुख खिमा पाव बनवून खायचो

Sanjay Raut-Anil Deshmukh used to make Khima Pav and eat it in jail

 

 

 

 

खासदार संजय राऊत नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. अशातच नुकतेच एक युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ऑर्थर जेलमधला अनुभव सांगितला आहे.

 

तिथले जीवनमान, शिस्त, जेवण्याचा वेळा, आणि नियम याबद्दल राऊत यांनी बरेच भाष्य केले. अशावेळी बोलत असताना संजय राऊतांनी जेलमधील अनिल देशमुख आणि त्यांचामध्ये घडलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला.

 

राऊत म्हणाले, देशमुख आणि मी एकत्र जेल मध्ये असताना खिमा पाव बनवून खायचो, राऊतांच्या याच विधानाने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

 

मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. राऊतांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली.संजय राऊत जवळपास तीन महिने जेलच्या आतमध्ये होते.

 

मुंबईतील ऑर्थर जेलमध्ये राऊत यांना ठेवण्यात आले होत. याच जेलमध्ये राऊतांसोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा वास्तव्याला होते. राऊतांनी माहिती दिली,

 

की काही जणांना वाटत असेल की खासदार आमदार मंत्र्यांना जेलमध्ये चांगली ट्रिटमेंट मिळत असेल पण तसे काहीच नाही.

 

राऊत म्हणाले आजूबाजूला अनोळखी लोक असतात.तुरुंगाच्या भिंती तुम्हाला खायला उठतात.विजेचे दिवे नेहमी चालू असतात.

 

पुढे राऊतांनी सागितले, माझ्या बाजूच्या खोलीत अनिल देशमुख राहत होते.तर समोर अजमल कसाबचा तुरुंग होता. कसाबचे साहित्य अजूनही तसेच त्या खोलीत ठेवण्यात आले आहे.

 

 

तुरुंगात खासदार किंवा आमदार म्हणून वेगळा असे काही ऐशोआराम नसतो. प्रत्येक ठिकाणी चेकिंगला सुद्धा तुमचे पूर्ण कपडे उतरवून तुम्हाला कैद्यासारखे चेक केले जाते.सकाळी लवकर उठावे लागते, दुपारचे जेवण अकरा आणि रात्रीचे जेवण सातला मिळते.

 

 

पुढे राऊत यांनी देशमुख आणि त्यांच्या जेलमधील काही गमतीशीर आठवणी सांगितल्या राऊत म्हणाले, अनिल देशमुख आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो.

 

तुरुंगात आठवड्यातून एक दिवस मांसाहार दिला जातो. मी आणि देशमुख कुठून तरी मटणाची व्यवस्था करायचो. तुंरुगात काही ओळखीचे लोक असतील त्यांचा मदतीने खिमा पाव करुन खायचो असे विधान राऊत यांनी केले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *