महिला रोखपालाचा विद्यापीठाला ४४ लाखांचा गंडा

44 lakhs due to the university by the female cashier

 

 

 

 

अलीकडेच आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते.

 

आता पुन्हा एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिला रोखपालाने विद्यापीठाला ४४ लाखांहून अधिक रकमेचा चुना लावला आहे.

 

बबिता नितीन मसराम (४०, एसआरपीएफ क्वॉर्टर्स, हिंगणा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती विद्यापीठात कनिष्ठ लिपिक पदावर असून कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्य करते. २०२३ मधील एका पावतीमुळे हा भ्रष्टाचार समोर आला.

एम. के. बिल्डरने विद्यापीठाच्या अभियंता विभागामार्फत ३४ हजार १६० रुपयांची पावती सुरक्षा ठेवीच्या रिफंडसाठी जमा केली होती.

 

वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता मूळ पावती केवळ ४ हजार १६० रुपयांची होती. त्यात बबिता मसरामच्या लॉगिन आयडीवरून २०२२मध्येच मॉडिफिकेशन झाले होते.

 

याबाबत विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी मसरामला विचारणा केली असता तिने चुकीने मॉडिफिकेशन झाल्याचा दावा केला व ३० हजार रुपये विद्यापीठाच्या खात्यात भरले.

 

मात्र, पालीवाल यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या युझर आयडीवरून दिलेल्या पावत्यांची तपासणी केली. त्यात तिने ४३९ पावत्या मॉडिफाय करत विद्यापीठाला

 

तब्बल ४४ लाख ४० हजारांचा गंडा घातल्याची बाब समोर आली. विद्यापीठाने आणखी चौकशी केल्यानंतर पालीवाल यांच्या तक्रारीवरून मसरामविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विद्यापीठात कॅश काऊंटरवरील रोखपाल एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करतात. त्यांना युझर आयडी व पासवर्डदेखील देण्यात आला आहे.

 

पैसे जमा केल्याची एखादी नोंद चुकली तर त्याच दिवशी त्यात बदल करण्याचे अधिकार रोखपालांना देण्यात आले आहेत. चूक नंतर समोर आली

 

तर अधिकारी पावती मॉडिफाय करू शकतात. मसराम हिने याच पावत्या मॉडिफाय करून विद्यापीठाला गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *