शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण; जयदीप आपटेला अटक,मात्र वकिलांचा मोठा गौप्यस्फोट

Statue of Shivaji Maharaj case; Jaideep Apte is arrested, but the lawyers have a big secret explosion

 

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता.

 

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयदीपला अटक करण्यात आल्यानंतर आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसंच, या प्रकरणी जयदीप आपटे यांच्या वकिलांची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे.

 

जयदीप आपटे आपल्या कुटुंबीयांना भेटायला आला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. मात्र यावर जयदीप आपटे यांचे वकील गणेश सोवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

जयदीप आपटे काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं ही स्टोरी साफ खोटी आहे. या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात असून काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्यात, असं गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.

 

 

या सर्व प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी न जाता जयदीपने स्वतः सरेंडर होणे आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजलं.

 

त्याप्रमाणे कुटुंबीयांसोबत चर्चा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला येऊन स्वतःला सरेंडर करेल आणि पुढची सर्व न्यायालय प्रक्रिया होईल हा कालच निर्णय झाला होता त्यानुसार सर्व घडलं आहे.

 

या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे. त्यामुळं या प्रकरणाला आणखी फाटे फुटू नयेत सर्व शांततेत व्हावे हाच त्याच्यामागचा हेतू होता. कोणतीही लपाछपी करायची नव्हती, असं गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.

 

जयदीप काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं ही काही स्टोरी सांगितले जाते हे सगळं साफ खोटं आहे, असं सांगतच तपास यंत्रणेला सहकार्य करणे,

 

जे काही आरोप झाले ते कसे निराधार आहे हे तपास यंत्रणेला सांगणं आणि न्यायालयाला सामोरे जाणे हे आम्ही ठरवलेलं आहे.

 

मालवणला गेल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करणार आहे. तेव्हा तिथे हजर होऊ आणि जो युक्तिवाद करायचा आहे तो केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

जयदीप आपटेला कल्याणच्या राहत्या घराच्या परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर त्याला सिंधुदुर्ग क्राइम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *