ॲटलस सायकल्सच्या माजी अध्यक्षांची आत्महत्या
Former president of Atlas Cycles commits suicide

ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलील कपूर (वय ७०) यांनी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सलील यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने थेट डोक्यात गोळी झाडली ज्यात त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (३ सप्टेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पूजा खोलीजवळ त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह व्यवस्थापकाला दिसून आला. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. त्यात सलील यांनी त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचं सांगितलं आहे.
सलील कपूर दिल्लीतील त्यांच्या बंगल्यावर होते. हा तीन मजली बंगला आहे. त्यात एक मंदिर आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्यवस्थापकाला सलील कपूर तळमजल्यावर असलेल्या मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याचं दिसत होते. दुपारी अडीच वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करण्यात आला आणि तुघलक रोड पोलीस घटनास्थळी पोहोचले.
कपूर यांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली.
घटनास्थळी कपूर यांचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर सापडले. कपूर यांनी मंदिरात स्वत:वर गोळी झाडल्याचा संशय आहे. घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे.
यामध्ये कपूर यांनी स्वत:वर पडणारा आर्थिक बोजा आणि चार जणांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला आहे. कपूर यांनी लिहिले आहे की त्यांनी चार लोकांकडून कर्ज घेतले होते
आणि ते फेडण्यासाठी ते आर्थिक संकटात सापडले होते. कर्ज फेडण्यासाठी त्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला, धमक्या दिल्या द्यायचे, याच त्रासातून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्या नोटमध्ये लिहिलं आहे.
सुसाईड नोटमध्ये ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांची माहिती पोलीस घेतल आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते,
अशीही माहिती आहे. सलील कपूर आर्थिक संकटात होते. त्यांचा घटस्फोट झाला होता आणि त्यांची मुलंही वेगळी राहतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. कपूर यांचे मॅनेजर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत राहत होते.