रामदास आठवले म्हणाले विधानसभेत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका
Ramdas Athawale said don't take Raj Thackeray with him in the assembly

“मी सोबत असल्यामुळे महायुतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊ नये. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. अजित पवारांमुळे महायुतीच कोणतंही नुकसान नाही.
लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेऊ नका”, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
“राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं
राहुल गांधींना शोभत नाही”, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
शिवाय, महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या अनेक सभाही पार पडल्या होत्या. पुणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि मुंबईतील लोकसभेच्या काही जागांसाठी
राज ठाकरेंच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, तर महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आल्या होत्या. शिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला.
त्यामुळे महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातील संख्या बळ 31 वर पोहोचलं होतं. त्यामुळे महायुतीच्या महाराष्ट्रात केवळ 17 जागा निवडून आल्या होत्या.
शिवाय, 23 खासदार संख्या असलेल्या भारतीय जनता पक्ष 9 जागांवर येऊन ठेपलेला पाहायला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला,
असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं होतं. दुसरीकडे रामदास आठवलेंनी अजित पवार यांच्या महायुतीला कोणताही फटका बसला नाही. मात्र, राज ठाकरेंच्या मनसेचाही महायुतीला फायदा झाला नाही, असं वक्तव्य केलं आहे.