भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरला
Bangladesh was shaken by the earthquake

बांगलादेशात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी 9.05 च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. भूंकप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 नोंदवण्यात आली.
भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भूकंपाचं केंद्र कोमिल्लाच्या दक्षिण आणि नैऋत्येस 48 किमी आहे. आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यामुळे उत्तर बंगालमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. उत्तर बंगाल जिल्ह्यांपैकी दक्षिण दिनाजपूर, अलीपुरद्वार येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
याआधी 8 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वारला भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी होती.
दुसरीकडे लडाखही हादरला आहे. लडाखमध्ये शनिवारी सकाळी 8.25 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किमी खाली होतं.