सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक
Supreme Court YouTube Channel Hack

सायबर भामट्यांकडून सर्वोच्च न्यायालयाने यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. चॅनल हॅक झाल्यानंतर हे चॅनल बंद करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील, असे त्या पत्रकात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. यूट्यूब चॅनल हॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी XRP म्हणजे
अमेरिकन क्रिप्टोकरेंसीची जाहिरात दिसून आली. एक्सआरपी हे अमेरिकेतील कंपनी रिपल लॅब्स द्वारा विकसित केलेली क्रिप्टोकरेंसी आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब 2018 मध्ये सुरु करण्यात आले होते. जनहीत प्रकरणाचे थेट प्रसारण करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सुरु करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरने चॅनल हॅक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला मागील सुनावणीचा व्हिडिओ खाजगी केले.
त्यानंतर ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी’च्या $2 बिलियन दंड! ‘XRP प्राइस प्रिडिक्शन’ नावाचा व्हिडिओ त्या ठिकाणी आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर अलीकडेच कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कथित अत्याचार
आणि हत्या प्रकरणाची याचिकेचे प्रसारण केले होते. सुनावणीच्या रेकॉर्डिंगचा शोध घेत असलेल्या युजरला सर्व व्हिडिओ खाजगी झाल्याचे दिसून आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, नेमके काय घडले याबद्दल काही सांगता येत नाही.
परंतु शुक्रवारी सकाळी चॅनल हॅक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने ही राष्ट्रीय इन्फॉरमेशन सेंटरला दिली.