उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये ; पाच पदाधिकाऱ्यांची केली उचलबांगडी; कार्यकर्त्यांनीही दिला ठाकरेंना थेट इशारा
Uddhav Thackeray in action mode; Picking up of five office bearers; Activists also gave a direct warning to Thackeray

विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीचं भंडाऱ्याच्या शिवसेना ठाकरे गटात दोन गट पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात
शिवसेनेच्या भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दोन गटात वाद निर्माण झाला होता.
ही बाब शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पोहचली असून पाच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करीत त्यांची पदावरून उचलबांगडी केली आहे.
पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्यांमध्ये भंडारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे, भंडारा उपजिल्हाप्रमुख दीपक गजभिये,
भंडारा विधानसभा संघटक चंदू उके, पवनी शहर प्रमुख शंकर भुरे, पवनी शहर संघटक आकाश दुर्गे या पाच जणांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटात भंडाऱ्यात उघड उघड दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झाल्यानं आगामी निवडणुकीत याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या गटानं पत्रकार परिषद घेवून भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्यावर गंभीर आरोप लावलेत.
बाजू नं ऐकता कारवाई केली असून ती पूर्णता चुकीची आहे. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम महागात पडेल, असा इशारा नरेश डहारे यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आता नेत्यांनीही डोक्यावर घेतलं आहे.
नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉ मनीषा निंबार्ते यांच्या समर्थकांनी भावी आमदार या आशयाचे बॅनर सर्वत्र लावले आहेत.
डॉ मनीषा निंबार्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर त्यांचा “भावी आमदार” असा उल्लेख केला आहे.
डॉ मनीषा निंबार्ते यांचे पती डॉ चंद्रकांत निंबार्ते यांना लोकसभेचं तिकीट मिळेल या अपेक्षेनं त्यांनी तयारी केली होती. मात्र, डॉ. प्रशांत पडोळे यांना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली.
तेव्हापासून डॉ. मनीषा निंबार्ते या काँग्रेस नेत्यांवर नाराज आहेत, हे विशेष. त्यात आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाचं काँग्रेस जिल्हा परिषद सदस्या निंबार्ते यांनी या माध्यमातून आव्हान तर दिलं नाही ना,अशी चर्चा आता भंडाऱ्यात रंगली आहे.