मुख्यमंत्री शिंदेनी जाहीर केला पहिला उमेदवार जाहीर, भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
Chief Minister Shindei announced the first candidate announced, BJP office bearers' resignation warning
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळता भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (13 ऑक्टोबरला) एका जाहीर कार्यक्रमात रामटेक विधानसभेतून आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी घोषित केली आहे.
आशिष जयस्वाल हे रामटेक मधून चार टर्मचे आमदार आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केल्यानं रामटेक विधानसभा शिवसेनेच्या कोट्यात गेल्याचे निश्चित मानलं जातंय. यामुळं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
आशिष जयस्वाल 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी मविआला पाठिंबा दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी जयस्वाल यांनी शिंदे यांची साथ दिली होती.
रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवणी मध्ये विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात आशिष जयस्वाल यांचा पक्षप्रवेश करत त्यांची उमेदवारी ही जाहीर केली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष जयस्वाल अपक्ष लढले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
युतीधर्म न पाळता भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजपच्या मसनर कार्यालयात एक काल बैठक पार पडली आहे.त्यात रामटेकची जागा भाजपने लढवावी अशी भुमिका देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आशिष जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे देणार असाही सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा असल्याची माहिती आहे.
मनसर येथे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मल्लिकार्जून रेड्डी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
“2019 मध्ये युतीधर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वाल यांना उमेदवारी का”?असा संतप्त सवाल भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.