विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार ,केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले संकेत

In how many phases will the assembly elections be held, the Central Election Commission has given an indication

 

 

 

विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाकडे राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही डोळे लागून राहिले आहेत. निवडणुकीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १४ अधिकाऱ्यांचे पथक

 

गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी या अधिकाऱ्यांनी आज बातचित केली. यावेळी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी

 

बहुतांश पक्षांनी केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वतीने माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

 

एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घ्या, अशी मागणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या

 

अधिकाऱ्यांची विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी आज चर्चा झाली. यावेळी निवडणूक खर्च २० लाख रुपयांनी वाढवण्याची मागणीही शेवाळेंनी केली.

 

आज निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवलं आहे. विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आणि त्यासंदर्भात काही सूचना असल्यास माहिती घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

 

निवडणूक खर्च २० लाख रुपयांनी वाढवावा, कारण महागाई वाढली आहे, सगळ्याच पक्षांनी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली, असं राहुल शेवाळे म्हणाले.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १४ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत आले. तीन दिवसांचा दौरा संपल्यानंतर शनिवारी या पथकाची पत्रकार परिषद मुंबईत होण्याची शक्यता आहे.

 

हे पथक शुक्रवारी विविध प्राधिकरणे, मुंबईसह राज्यातील पोलिस आयुक्त आणि पालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

या पथकात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यसह नेतृत्वात धर्मेंद्र शर्मा, नितेश व्यास, मनिष गर्ग (तिघेही वरिष्ठ निवडणूक उपायुक्त); ह्रिदेश कुमार, अजीत कुमार,

 

मनोजकुमार साहो, संजय कुमार (निवडणूक उपायुक्त), एन. एन. बुटोलिया (वरिष्ठ प्रधान सचिव), शुभ्रा सक्सेना, यशवेंद्र सिंग,

 

दीपाली मसिरकर (संचालक), सुमन कुमार दास (सचिव), अनुज चांडक (सहसचिव) आणि अनिलकुमार (अवर सचिव) यांचा समावेश आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *