उद्या पूर्णेत शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक

An important Shiv Sena Thackeray group meeting in Purna tomorrow

पूर्णा-शेख तौफिक /9970443024

 

 

शिवसेना ठाकरे गट पूर्णा तालुक्याच्या वतीने सोमवारी ३० रोजी सकाळी ११ वा बाजार समितीच्या सभागृहात सेनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधींच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे यांनी केले आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूकीचा बार उडणार असल्याने राजकीय पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

यापार्श्वभुमीवर पुर्णा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीसाठी येथिल बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.

 

बैठकीस शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,गंगाखेड विधानसभा प्रमुख तथा मा.जिल्हाप्रमुख बालाजी देसाई, सुधाकर खराटे,उप जिल्हाप्रमुख दशरथ भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

तरी या बैठकीस शिवसेनेचे सर्व उपतालुका प्रमुख,सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख,बाजार समिती सभापती,उपसभापती,सर्व संचालक, शाखा प्रमुख, युवा सेनेचे सर्व ग्रामीण शहरी भागातील आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिंनीधी,

 

चेअरमन, सरपंच, सोसायटी सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,शिवसेना सलग्नित विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन

 

तालुका प्रमुख काशीनाथ काळबांडे शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, युवासेना ता.प्र बंडू आपा बनसोडे यांनी केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *