स्वेटर, मफलर काढा ,थंडीला होतेय सुरुवात !

Take off the sweater, muffler, it's getting cold

 

 

 

मान्सून अजूनही परतण्याच्या स्थितीत नाहीये. कारण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अजूनही मान्सून सक्रिय दिसत आहे. राजधानी दिल्लीत पावसाने काहीसा दिलासा दिलाय.

 

दिल्लीत आज हलक्या पावसाचा इशारा होता. हवामान खात्याने जवळपास दहा राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातही मान्सून सक्रिय आहे.

 

येथे संततधार पाऊस सुरू आहे. उज्जैनमध्ये शुक्रवारी उशिरा महाकालेश्वर मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ भिंत कोसळली. ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले होते.

 

देशाच्या राजधानीत मान्सून कमी सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसापासून दिलासा मिळाला आहे. दुपारनंतर येथे तापमानात वाढ झालीये. पण शनिवारपर्यंत असाच रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

 

IMDच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही भागात मुसळधार पावसासह मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

या राज्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विदर्भ, बिहार, दक्षिण मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ईशान्य भारताच्या काही भागात, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक,

 

मध्य भागात रिमझिम ते मध्यम पाऊस पडेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, अंतर्गत कर्नाटक, हरियाणा, मराठवाडा, पंजाब आणि लडाखमध्ये संथ पावसाची शक्यता आहे.

 

मान्सून 2024 चा हंगाम संपला असला तरी पाऊस सुरुच आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, यावर्षी सरासरीपेक्षा ७.६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

 

राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. अशा स्थितीत मान्सून संपल्यानंतर आता थंडीला सुरुवात होऊ शकते.

 

हवामान खात्याने मंगळवारी सांगितले की, उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

आयएमडीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत राजस्थान, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तानच्या काही भागांतून मान्सूनच्या प्रस्थानासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *