उमेदवारीसाठी मनोज जरांगेची 700 ते 800 इच्छुक उमेदवारानी घेतली भेट
700 to 800 interested candidates met Manoj Jarange for candidacy
“महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतलीये. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवारांचं फार भयाण काम आहे.
उमेदवार पाहिले की वाटतं कुठून या लफड्यात पडलो. मरणाचे उमेदवार आहेत. माझ्याकडे 700 ते 800 लोक आले. आम्हाला वाटतं होतं की मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील,
पण सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातून आले. त्यानंतर नंबर 2 ला मराठवाड्यातून आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही”, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज विशेष गोष्ट मला मराठा समजाला सांगायची आहे. पण सरकार डाव टाकतेय, हे समाजाला सांगणे आवश्यक आहे.
सरकारने दोन दिवसात नवीन डाव टाकला असून त्यांनी निवडणुकाच डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते,
अजून 4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. त्यामुळे सरकार आपली भूमिका आहे याची वाट पाहतेय.
आपली रणनीती सुरू असून 29 ऑगस्टला आपण काय भूमिका घेतो हे सरकारला पाहायचे आहे. त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल.
यावेळेस जे होईल ते होईल,आपली रणनीती डाव प्रतिडाव कळू नयेत. निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर आपण बैठक ठरवू. आपले डाव सरकार ला का कळू द्यायचे?
सर्वांना मराठा समाजाला सांगायचे , त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, प्रत्येक गावाने ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना नोंदी मिळाल्या नसल्याने तहसीलदारांकडे जाऊन जाब विचारा.
सरकारवर बेकार वेळ, ते आपल्या भूमिकेवर ते ठरवणार होते. आता आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठक ठेऊ, या बैठकीला मी येतो.
दीड दोन महिन्यानंतर ठरवू, लढायच की नाही? सर्वात मोठा रोष शेतकऱ्याचा आहे. इच्छुकांच्या अर्जाची तोवर तज्ज्ञांमार्फत छाननी करू, असंही जरांगे यांनी सांगितलं.