लाच घेतांना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासह शिपाई अटकेत

Constable along with child development project officer arrested while accepting bribe

 

 

 

अंगणवाडी मदतनीस कार्यकर्तीस अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी ५० हजारांची पहिल्यांदा मागणी केली. त्यानंतर २५ हजार मागितले. तडजोडीत २० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर

 

तेवढी रक्कम घेताना वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातील बालविका प्रकल्प अधिकारी

 

व शिपायास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पकडले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुनील चव्हाण व अनंत सूर्यभान बुट्टे, असे लाच मागण्याऱ्या अधिकारी व शिपायाचे नाव आहे.

 

तक्रारदाराची पत्नी शहाजतपूर येथे २०१५ पासून अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहे. त्यांना अंगणवाडी सेविका पदावर पदाेन्नती मिळाली होती.

 

परंतु उच्च न्यायालयात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका पदाच्या पदोन्नतीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे तक्रारदाराच्या पत्नीला पदोन्नती मिळाली नव्हती.

 

त्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी अंगणवाडी सेविका पदाच्या पदोन्नतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून हटवण्यात आली. त्यानुसार अंगणवाडी मदतनीस कार्यकर्तीने पदोन्नती देण्याबाबत भेट घेतली असता

 

५० हजारांची मागणी केली. मदतनीस यांच्या पतीनेही भेट घेतली असता २५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार देण्याचे ठरले. तसेच तक्रारदारांसोबतच्या विशाल काळुंखे

 

व ज्ञानेश्वर मुलमुले या दोन साक्षीदारांकडेही दहा हजार रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष सापळा अधिकारी, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने अनिल चव्हाण व अनंता बुट्टे यांना लाच घेताना पकडले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *