शरद पवार म्हणाले “जावई कुणाचा? आम्ही कुठेही पोरी देत नसतो”

Sharad Pawar said “whose son-in-law? We don't give babies anywhere"

 

 

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपला मोठे खिंडार पडले आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे.

 

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतली.

 

आता हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले. तुम्ही हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा.

 

मला निवडणूक लढायची नाही. मला १४ वेळा निवडून दिलं. मला स्वतसाठी काही नको. मला राज्याचा चेहरा बदलायचा आहे, असे शरद पवार म्हणाले.

 

शरद पवार यांनी इंदापुरात दणदणीत भाषण केले. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे जावई आहेत.

 

त्यामुळे शरद पवारांनी केलेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख जावई असा करत महाराष्ट्राचाही संसार नीट करण्याची ताकद असल्याचा हा जावई आहे, असे म्हटले.

 

मी ६७ मध्ये विधानसभेत आलो. तेव्हा मी २७ वर्षाचा होतो. विधीमंडळात काम कसं करावं, व्यक्तिगत भूमिका स्वच्छ कशी ठेवायची याचा आदर्श आम्ही शंकरराव भाऊंचा असायचा. ते वडीलधारी होते.

 

त्यांचा अधिकार असायचा. नंतर त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करायचा हा आदर्श आम्हाला भाऊंनी दिला.

 

पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा शंकरराव भाऊंशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या विचाराचा वारसा हर्षवर्धन घेऊन जात आहेत, असे शरद पवार म्हणाले.

 

 

मागच्या निवडणुका झाल्या. पुणे जिल्हा आणि राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात सर्व जातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं, असा माझा हेतू होता. त्याच हेतूने इंदापूरकडे माझं लक्ष दिलं होतं.

 

इंदापूरच्या एका सहकाऱ्याला जिल्ह्याचं प्रमुख केलं, त्याला विधानसभेत नेलं, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. इंदापूर तालुक्यातील दुष्काळ, कारखानदारीची वाढ करणारा सहकारी असला पाहिजे,

 

म्हणून ही भूमिका घेतली. पण अलिकडच्या कालावधीत जे काही ऐकलं त्याने धक्का बसला. इंदापूरचं राजकारण, शंकरराव भाऊंचं राजकारण स्वच्छ चारित्र्याचं होतं.

 

नव्या पैशाचा विचार करत नव्हते. अलिकडच्या काळात इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं,. बोर्डावर वाचलं मलिदा गँग संपवा.

 

बारामतीत आहे, मलिदा गँग. पण इकडे मलिदा गँग आहे हे आता कळलं. तुम्हीही सांगितलं नाही, असेही शरद पवारांनी म्हटले.

 

“मी ५५ वर्ष अनेक पदावर आहे. अधिकाऱ्यांसोबत चांगल्या ओळखी आहे. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्या हाताखाली काम केलं. मी त्यांच्याकडे चौकशी करत असतो. ते सांगतात, जुने दिवस राहिले नाही.

 

हर्षवर्धन तिकडे गेले. तेव्हा वाटलं रस्ता चुकला. भाऊंनी आपल्याला रस्ता दाखवला. त्यांचा विचार गांधी नेहरूंचा होता. पण हर्षवर्धन यांचं मन इकडे होतं. मला आनंद होतोय.

 

त्यांनी अखेर निर्णय घेतला. साखर कारखानदारीसाठी त्यांच्या निर्णयाचा फायदा होईल. आता फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला.

 

तोच फलटणला घेणार आहे. तिथे महिनाभर कार्यक्रम बूक आहे. एकत्र आलं पाहिजे हे सर्वांच्या मनात आहे. सर्वजण एकत्र येत आहेत.

 

हर्षवर्धन बोलता बोलता बोलता म्हणाले, काही काम आम्हाला द्या. काहीही काम करायला हर्षवर्धन कशाला. कठिण काम असेल, लोकांच्या जीवनमरणाचं काम असेल तर हर्षवर्धनला देऊ. तुम्हाला आता ते करावं लागेल.

 

तुम्ही हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा. मी फिरतोय. मला निवडणूक लढायची नाही. मला १४ वेळा निवडून दिलं. मला स्वतसाठी काही नको.

 

मला राज्याचा चेहरा बदलायचा आहे. लोकांचं जीवनमान बदलायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आहे. ते जर करायचं असेल तर ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, प्रशासन आहे,

 

अशा लोकांची गरज आहे. त्यामुळे अशा लोकांना विधानसभेत त्यांना सोपवण्याचं तुमचं काम आहे. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचं काम माझं आहे”, असं म्हणत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

 

“काही लोक विचारत होते कसं होणार, कसं होणार. म्हटलं काही काळजी करू नका. जावई कुणाचा? आम्ही कुठेही पोरी देत नसतो. आम्ही चांगलं घर पाहून मुली देत असतो.

 

संसार नीट चालला. तसा महाराष्ट्राचाही संसार नीट करण्याची ताकद असल्याचा हा जावई आहे, हे बारामतीकरांनी तेव्हा पाहिलं होतं”, असेही शरद पवार म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *