भाजपने हरियाना जिंकले ; काँग्रेसचा निकालावर आक्षेप
BJP wins Haryana; Congress objected to the result
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. सत्तारुढ भाजपा सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली. यावेळी मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या एक तासांतच निवडणुकीचे कल स्पष्ट झाले असून काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
8 Oct 2024, 18:21 वाजता
हरियाणातील चित्र स्पष्ट, भाजपाला बहुमत, काँग्रेसचा निकालावर आक्षेप
हरियाणा विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. हरियाणात पुन्हा एकदा भगवा फडकला आहे, भाजपाने विजयाची हॅटट्रीक केली आहे. या निकालामुळे काँग्रेसच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालांवर आक्षेप घेत काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला आहे. हरियाणा विधानसभेतील 90 जागांपैकी भाजपने 48 जागांसह बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेसची गाडी 37 जागांवर अडकली आहे.
, 15:16 वाजता
हरियाणात दोन तासात बाजी पलटली, भाजपने बाजी मारली
हरियाणात भाजप विजयाची हॅटट्रीक करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 90 जागांपैकी भाजपने 50 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसची गाडी 34 जागांवर अडकली आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. पण अवघ्या दोन तासात बाजी पलटली आणि भाजपने जोरदार कमबॅक केला.
13:48 वाजता
काँग्रेसची उमेदवार विनेश फोगाटची भाजप उमेदवारावर मात
हरियाणा विधानसभा निडणुकीतील जुलाना मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला काँग्रेसने उमेदवारी दिली होती.
काँग्रेसने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. अखेर या जागेवरुन विनेश फोगाटने विजय मिळवला आहे. विनेशने भाजप उमेदवार योगेश कुमार यांच्यावर मात केली आहे.
13:30 वाजता
वीरेंद्र सेहवागने प्रचार केलेल्या जागेवर काय स्थिती?
हरियाणामध्ये वीरेंद्र सेहवागने तोशाम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी प्रचार केला होता. या जागेवर भाजपने श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली असून नवव्या फेरीनंतर श्रुती चौधरी आघाडीवर आहेत. नवव्या फेरीनंतर श्रुती यांना 43338 मतं मिळाली आहेत. तर अनिरुद्ध चौधरी यांना 34673 मतं मिळालीत.
12:47 वाजता
हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तास्थापन करणार?
हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर यायला सुरुवात झाली आहे. आत्ताच्या कलानुसार भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तर, काँग्रेस पिछाडीवर आहे.
12:12 वाजता
निवडणूक आयोगाचा निकाल संथगतीने का?; काँग्रेसचा सवाल
हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर यायला सुरुवात झाली आहे. अशावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहित सवाल उपस्थित केले आहेत. भाजप आयोगावर दबाव टाकत आहे का, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
12:09 वाजता
काँग्रेसचा निवडणुक आयोगावर गंभीर आरोप
हरियाणा विधानसभा निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या दरम्यान काँग्रेसने निवडणुक आयोगाने आरोप केला आहे. निवडणुक आयोग निकाल घोषित करण्यास विलंब करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.