मनोज जरांगे पाटलांनी दिला राज्यात उलथापालथ करण्याचा इशारा आचारसंहिता लागल्यावर मुख्य भूमिका मांडणार
Manoj Jarange Patal has warned of upheaval in the state and will play a key role when the code of conduct is implemented
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायण गडावर पार पडला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय.
आचारसंहितेच्या आत निर्णय घ्या. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा नाही, आरक्षण नाही.
कैकाडी, लिंगायत समाजाला काही दिलं जात नाही. आपणच फक्त असा समुदाय आहे , जो सर्वांसाठी लढतोय, असंही जरागेंनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला आणि माझ्या समाजाला शब्द पाहिजे आणि उत्तर पाहिजे. काल 17 जाती ओबीसीमध्ये गेल्या आता तुम्हाला धक्का लागत नाही का? तुम्हीच म्हणालात.
ज्या वेळी आम्ही आरक्षण मागितलं. त्यावेळी एकजण म्हणाला, महाविकास आघाडीमधून लिहून घ्या. आता मला उत्तर द्यायचं.
तुम्ही 17 जाती ओबीसीमध्ये घातल्या. तुम्ही महाविकास आघाडीमधून लिहून घेतलं का? ज्यावेळी आपण मागत होतो, त्यावेळेस म्हणाले धक्का लागतो. आता एकजण बोलत नाही, धक्का लागला म्हणून.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण प्रत्येक ऋषीने दिली. वारकरी संप्रदायाने दिली आहे. आपल्याला म्हणयाचे हुशार नेते आहेत.
हिंदू धर्माने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. अन्याय सहन करायचा नाही. अन्याय होत असेल न्यायासाठी उठाव करायचा. सरकारकडे अन्यायाविरुद्ध मागणी आहे. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण द्या.
काही जणांना सांगितलं. तुमच्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागतो. तुमच्यामुळे आमचं आरक्षण कमी होतं. मी इमानदार माणूस आहे. मला पूर्ण घेरलं आहे.
या गडावर एक शब्द खोटं बोलणार नाही. मला सांगावं लागतय, माझा नाइलाज आहे. मला होणाऱ्या वेदना समाज सहन करत नाही. माझ्या समाजाचा त्रास मला सहन होतं नाही.
मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस रडतो. माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका. पक्ष पक्ष करु नका. सारखं नेता नेता करु नका.
तुमच्या लेकराच्या अंगावर गुलाल टाका. यांनी मला असं घेरलंय की, आरक्षणाची मागणी 14 महिन्यांपासून आहे. एकही मागणी मान्य केली नाही. 14 महिने झाले गोरगरिबांसाठी आरक्षणाचा लढा सुरु आहे, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.
राज्यात आपल्या समाजावर अन्याय होणार असेल, तर आपल्याला उठावा करावाच लागेल. यावेळी आपल्याला उलथापालथ करावीच लागेल,
अशा शब्दांमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर झालेल्या अति भव्य दसरा मेळाव्यामध्ये हुंकार भरला. नारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळावासाठी राज्यभरातून विराट गर्दी झाली आहे.
लाखोंचा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर पोहोचला आहे. त्यामुळे नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील कोणता संदेश देणार? याकडे राजकीय वर्तुळासह मराठा समाजाचे सुद्धा लक्ष होते.
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच समाजावर अन्याय होणार असल्यास शांत बसणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की एकवेळा याठिकाणी झालेली गर्दी कॅमेरामनमधून लोकांना दाखवू द्या.
एकदा त्यांचं दाताड पडू द्या; कार्यक्रमच झाला म्हणून समजा, अशा शब्दामध्ये त्यांनी टोला लगावला. या नारायण गडाने कधीच जातीची शिकवण दिली नसून समतेचा संदेश दिला असल्याचे ते म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले की, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरलं आहे. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही.
मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो.
पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका.
त्यांनी सांगितले की, लढायला शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे.
आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही.
प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.