सगळ्यांची बंडखोरी चार तारखेपर्यंत शांत करू;नाना पटोले

We will pacify everyone's rebellion till the fourth date; Nana Patole

 

 

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे

 

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

 

“महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शाहू, फुले, आंबेडकर त्यांच्या विचाराला संपवण्याचं पाप भाजप प्रणित एकनाथ शिंदेचे सरकार करते आहे. त्याच्या विरोधात लोकांमध्ये भयानक राग आहे”, असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी भंडारामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन ठरलेलं आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं बहुमताचं सरकार येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

 

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं पाप भाजपप्रणित एकनाथ शिंदेंचे सरकार करते आहे. त्याच्याविरोधात लोकांमध्ये भयानक राग आहे.

 

शेतकरी अडचणीत आहेत. तरुण अडचणीत आहेत. महिला असुरक्षित आहेत आणि हे सर्व सरकार जाणून-बुजून करतं आहे. या अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध आम्ही शंखनाद पुकारला आहे”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

 

यावेळी त्यांनी पक्षातील बंडखोरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “बंडखोरीचा प्रकार हा सगळ्यात पक्षामध्ये सुरू आहे. राजेंद्र मुळक असतील किंवा अन्य कोणीही सगळ्यांची बंडखोरी ही आम्ही चार तारखेपर्यंत शांत करू”, असं नाना पटोले म्हणाले.

 

यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही मोठी टीका केली. “हे बेईमान भाऊ जे आहेत, ते स्वतःला बहिणींच्या जवळचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या बेईमान भावांना लाडक्या बहिणींनी ओळखून घेतलं आहे.

 

दीड हजार रुपये बहिणींना दिले आणि गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये जी महागाई वाढवली आणि त्यांच्या जवळून पाच हजार रुपये काढलेत”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

“आता सर्व बहिणी त्यांना ओळखून आहेत. काँग्रेसने याच्यामध्ये जो कायदा केला होता की, मुलीचा सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये नाव असले पाहिजे. दिवाळीचा सण आहे याच्यानंतर भाऊबीज येणार आहे.

 

आज आपण पाहतोय की भावा-बहिणीमधलं जे नातं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. काँग्रेसने त्या पद्धतीचे कायदे करून प्रेमाचे, बहिण भावाचे, सन्मानाचे संबंध हे कायम ठेवले पाहिजेत.

 

मात्र, या बेईमान भावाने आपली कहाणी बनवली तरी त्याला काही अर्थ नाही. बहिणी या समजून आहेत. महाविकासआघाडीच्या सोबत आहेत.

 

आज बहिणी असुरक्षित आहेत. चार पाच वर्षाच्या मुली सुद्धा शाळेत असुरक्षित आहेत. बहिणींना सगळ्या गोष्टी कळतात. भ्रष्टाचाराने कमवायला पैशातून सत्तेत बसलेले लोक काहीही जाहिराती करतात. त्याला आता मान्यता नाही. एवढं त्यांनी समजलं पाहिजे”, असेही नाना पटोले म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *