मुंबईतील सर जे.जे. कॉलेज मधून सृष्टी संतोषकुमार चिद्रवार तृतीय क्रमांकावर

Shrishti Santoshkumar Chidrawar from Sir J.J. College, Mumbai, ranked third.

bj admission
bj admission

 

 

 

मूळची परभणीतील उदयोन्मुख कमर्शियल आर्टिस्ट सृष्टी संतोषकुमार चिद्रवार ही बी.एफ.ए.अंतिम वर्षाच्या परीक्षेत सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट मुंबई मधून तृतीय आली आहे.

हे सुद्धा वाचा;इराण इस्राईल युद्ध ब्रेकिंग; इराणचा इस्रायलवर हल्ला , ड्रोन डागले, जाॅर्डनमध्ये सायरन वाजू लागले

नुकताच बीएफ अंतिम वर्ष 2025 चा निकाल जाहीर झाला आहे.ती या परीक्षेत फर्स्ट क्लास पास झाली आहे. यापूर्वी अनेक चित्रकला स्पर्धेत तिने पारितोषिक मिळवलेली आहेत.

हे सुद्धा वाचा;शिंदेंचे मराठवाड्यातील मंत्री म्हणाले ,उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावले तर मी जाणार

ऑक्टोबर 2022 या वर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांक मिळवलेला होता.

हे सुद्धा वाचा;वीज वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिला 25 हजार रुपयांचे प्रथम रोख पारितोषिक देऊन त्रिमूर्ती हॉल मुंबई मंत्रालय येथे गौरविण्यात आले होते. सृष्टी इयत्ता नववी मध्ये असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या कलेचे पत्र पाठवून कौतुक केले होते.

हे सुद्धा वाचा;Maharashtra Breaking News;शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने दिले हे आश्वासन

सृष्टीचे वडील संतोषकुमार चिद्रवार हे जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथे इंग्लिश भाषा शिक्षक आहेत. सृष्टीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *