विधानसभा निवडणुक निकालावरुन काँग्रेसचा गंभीर आरोप
Congress makes serious allegations on assembly election results,The Bharatiya Janata Party government in the Maharashtra and Haryana assembly elections did not come to power based on the votes cast by the people, but rather by stealing votes with the help of the Election Commission.

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे.
स्मार्ट मीटर च्या विरोधात जनतेचा उद्रेक , संघर्ष समितीने दिला इशारा
मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे आणि हे परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पुन्हा पकडली आहे. आपण अपराधी आहोत, चोरी करत आहोत याचा पुरावा ते देत आहेत. महाराष्ट्रात चोरी पकडली गेली आहे.
मतचोरीचे पुरावे लपवण्यासाठी आयोगाने कायद्यातही बदल केले. चंदिगड उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयोगाने सीसीटीव्ही फुटेज, मशिन रिडेबल व्होटर लिस्ट संदर्भातील कायदा बदलला.
सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना
आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक परिपत्रक काढले आहे. लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेले नाही तर चोरीचे सरकार महाराष्ट्र व हरियाणात आणलेले आहे,
हे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. आता बिहारमध्ये चोरीचा वेगळा प्रकार सुरु केला आहे, यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले पाहिजे, मतदानाची चोरी केलेले सरकार संविधान संमत असू शकत नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.
पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गेल्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे.
काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे?
शिंदेंचे मंत्री पोहोचले मनसेच्या मोर्चात गो बॅक… गो बॅक… चे नारे देत मंत्र्याविरोधात जनआक्रोश…
असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.